जैवविविधता आणि पर्यावरण यांचं अतूट असे नातं…

सुहास वायंगणकर:वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे व्याख्यान संपन्न..

⚡मालवण ता.२५-:
जैवविविधता आणि पर्यावरण यांचं अतूट असे नातं आहे. दोघांचेही योग्य जाणीव आणि संवर्धन हेच आपल्या भविष्याचं खरे रक्षण आहे.
आज पर्यावरणचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याने आपण जर जैवविविधता आणि पर्यावरणाबद्दल सजग राहिलो, तरच आपली पृथ्वी सुंदर, समृद्ध आणि आरोग्यदायी राहील. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर जबाबदारी घेतली, तर मोठा बदल घडवू शकतो. असे प्रतिपादन कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ सुहास वायंगणकर यांनी कट्टा येथे बोलताना केले

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे जैवविविधता या विषयावर सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ सुहास वायंगणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सुहास वायंगणकर गेली सत्तावीस वर्ष पर्यावरण व वन्यजीव संरक्षण संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत. पर्यावरण क्षेत्रात काम करताना पर्यावरण विषयक परिस्थिती पर्यावरणीय समस्या याबद्दलची जागरूकता तरुण पिढीत असणे आवश्यक आहे यासाठी अनेक शाळां महाविद्यालयांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.

यावेळी श्री सुहास वायंगणकर यांनी आपल्या जैवविविधतेत असणारे विविध वृक्ष, प्राणी,पक्षी, कीटक विविध प्रजातींचे साप यांचे पर्यावरणातील महत्त्व स्लाईड शोच्या माध्यमातून दाखवून आपली समृद्ध वनसंपदा आपण राखली पाहिजे त्याचबरोबर या पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे महत्त्व त्यानी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

यावेळी व्यासपीठावर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सुनीलचंद्र देशपांडे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर, सचिव श्रीम. विजयश्री देसाई, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट व इतर शिक्षक उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण तज्ञ सुहास वायंगणकर यांना कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी केले.

You cannot copy content of this page