जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त कणकवलीत सामाजिक उपक्रम…

कणकवली : जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, तालुका शाखा कणकवलीतर्फे उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी अपघात विभागासाठी फ्रिज भेट देण्यात आला तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाबद्दल वैद्यकीय अधीक्षकांनी संघटनेचे मनःपूर्वक आभार मानले आणि फार्मासिस्ट दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास डॉ. विशाल रेड्डी, श्रीमती नुपूर पवार, सी. आर. सावंत, अशोक रणदिवे, श्री. चौरे, प्रशांत बुचडे, दयानंद उबाळे, श्री. पाध्ये, श्री. म्हापसेकर, श्री. योगेश तसेच औषध निर्माण अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page