आमदार दीपक केसरकर:गोवा सरकारनं हत्तीला आपल्याकडे ठेवाव, माझा विरोध नाही. पण, स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होऊ नये हीच अपेक्षा..
⚡सावंतवाडी ता.२५-: वनतारा’मध्ये योग्य ती काळजी घेतली जाते असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. हत्ती विकला कुठे जातो, तो प्रश्नच नाही. प्राण्यांना पकडण्यासाठीची योजना त्यांच्याकडे आहे हे समोर आले आहे. हत्तीबाधीत शेतकऱ्यांच दुःख मी समजू शकतो. त्या हत्तींना हाताळण्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे नाही. अन्यथा, पर्यटन वाढीसाठी हत्ती इथे ठेवले असते. हे हत्ती सुरक्षित राहू शकतील यासाठी ती भूमिका आम्ही घेतली आहे. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
दरम्यान गोवा सरकारनं हत्तीला आपल्याकडे ठेवाव, माझा विरोध नाही. पण, स्थानिक शेतकऱ्यांना त्रास होऊ नये हीच अपेक्षा आहे. कर्नाटकच्या वन विभागान हत्ती परत नेण्याबाबत तयारी दाखवली नाही. महाराष्ट्राचा प्रस्ताव मान्य केला नाही. गोव्यान तसा प्रस्ताव पाठविला तर आनंद आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये हीच भूमिका आहे. असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
अंमली पदार्थांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले, अंमली पदार्थ सर्वात वाईट असून यामुळे पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे यावर कारवाई होण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस निरीक्षकांशी मी बोललो आहे. यापूर्वीही तशी मागणी मी केली होती. या गोष्टी जिल्ह्यात येऊ नयेत यासाठी कारवाई केली जाईल, तरच पुढची पिढी व्यसनाधीन होणार नाही असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच शहरातली खड्डे तात्काळ बुजविण्यासाठी प्रशासनाला सांगेन. इतर ठिकाणापेक्षा आपल्याकडे चांगली परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, तालुका प्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.
