आमदार दीपक केसरकर: इलेक्शन आल्यावर काही लोक लहान लहान गोष्टीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील, विरोधकांना टोला..
⚡सावंतवाडी ता.२५-: इतर मतदारसंघापेक्षा सावंतवाडी मतदारसंघातील रस्त्याची अवस्था चांगली आहे. तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडलेत ते खड्डे भरून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु काही रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असल्याने आपण संबंधित कॉन्ट्रॅक्टरावर नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.
दरम्यान आता इलेक्शन आल्याने काही लोक लहान लहान गोष्टीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील असा टोला देखील त्यांनी यावेळी विरोधकांना हाणला. तसेच मतदारसंघात अवैध धंद्यांबाबत आपण पोलिसांचे लक्ष वेधले असून, त्या संदर्भात कारवाईचे आदेश देखील दिले असून जो कोणी अवैध धंद्यात सापडेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची आपण आदेश दिले असल्याचे देखील केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
