Headlines

‘शिवभूषण’ या काव्याचे २८ सप्टेंबर रोजी फोंडाघाट येथे सादरीकरण…

⚡मालवण ता.२६-:शिवशंभो सामाजिक कला, क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवभूषण’ या काव्याचे विशेष सादरीकरण सोहळा २८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता कुळदेव मंदिर, कुळाचीवाडी फोंडाघाट येथे होणार आहे. कविवर्य भूषण यांनी रचलेल्या या काव्याचे छंदात्मक सादरीकरण मालवण येथील श्री. भूषण साटम करणार आहेत. माहितीसाठी अशोक…

Read Full News

विनायक राऊत रविवारी मालवण तालुक्याच्या दौऱ्यावर…!

⚡मालवण ता.२६-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत रविवारी २८ सप्टेंबर रोजी मालवण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे. रविवार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आचरा बंदर येथे नवरात्र उत्सवास भेट व देवी दर्शन, सायंकाळी ५.३० वाजता आचरा हिर्लेवाडी येथे नवरात्र उत्सवास भेट व…

Read Full News

घुमडे येथील भवानी मंदिरात २८ रोजी भजन कार्यक्रम…!

⚡मालवण ता.२६-:घुमड़े वस्तवाडी येथील श्री भवानी मंदिरात दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विठ्ठल रखुमाई महिला वारकरी भजन मंडळ, खैदा यांचे भजन, सायं. ७.३० वाजता श्री भवानी देवी प्रासादिक भजन मंडळ, घुमडे यांचे भजन, रात्री ९ वाजता श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव- कातवड यांचे भजन होणार आहे. भजनप्रेमीनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात…

Read Full News

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन…

⚡कणकवली ता.२६-: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी कणकवली येथे भारतीय जनता पार्टी तालुका वतीने आयोजित नवरात्र उत्सवाला भेट दिली. त्यांनी दुर्गामातेची आरती करून आशीर्वाद घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा सत्कार केला. यावेळी…

Read Full News

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन…

⚡कणकवली ता.२६-: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी कणकवली येथे भारतीय जनता पार्टी तालुका वतीने आयोजित नवरात्र उत्सवाला भेट दिली. त्यांनी दुर्गामातेची आरती करून आशीर्वाद घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा सत्कार केला. यावेळी…

Read Full News

मालवण शहरातील दिव्यांगांना हयातीचे प्रमाणपत्र जमा करण्याचे आवाहन…!

⚡मालवण ता.२६-:सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षामध्ये मालवण नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना दारिद्र्य निर्मूलन योजनेंतर्गत ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. मालवण नगरपालिकेकडे ज्या दिव्यांगांनी नोंदणी केली आहे, अशांनी हयातीचे प्रमाणपत्र दि. १० ऑक्टोबरपर्यंत मालवण नगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करायचे आहे. मालवण नगरपालिका हद्दीतील दिव्यांगांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा दिव्यांगांनी मालवण नगरपालिका कार्यालयात कार्यालयीन…

Read Full News

मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांना मानाचा ‘राजधानी’ पुरस्कार जाहीर…

⚡मालवण ता.२६-:मालवणी भाषेतील ज्येष्ठ कवी रुजारिओ पास्कल पिंटो यांना मानाचा राजधानी पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असून या पुरस्काराचे वितरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते मालगुंड येथे ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नव्या युगाचे आद्य कवी केशवसुत उर्फ…

Read Full News

युवा मित्रमंडळ पाचलकोंड धनगरवाडी आयोजित गजानृत्य स्पर्धा व भव्य दसरा उत्सव…

वैभववाडी प्रतिनिधीस्व.श्री महादेव पटकारे स्मरणार्थ युवा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गजानृत्य स्पर्धा व भव्यदिव्य दसरा उत्सवाचे आयोजन दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी श्री महागणपती मंदिर सभागृह, पाचल बाजारपेठ, एस.टी. स्टँड शेजारी पाचल येथे करण्यात आले आहेभव्य गजानृत्य स्पर्धा आणि दसरा उत्सवाला समाजातील अनेक सामाजिक प्रतिष्ठित नेते, मान्यवर तसेच स्थानिक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांनी स्केटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेत केली चौकशी…!

⚡सावंतवाडी ता.२६-: राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणात स्केटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेत चौकशी केली. नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. राणे आले असता मैदानी खेळाचे धडे घेणाऱ्या या विद्यार्थ्यांसह ते रमताना दिसले. यावेळी नितेश राणे यांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा तसेच अन्य सर्व सुविधांसाठी…

Read Full News

धनगर आरक्षण लढ्याला कोकणातून पाठिंबा

वैभववाडी :जालन्यातील दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या धनगर आरक्षण लढ्याला कोकणातील वैभववाडी तालुक्यातील युवा धनगर समाज नेते सुशांत शेळके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले की, जर राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देताना हैद्राबाद गॅजेटचा आधार घेत असेल, तर धनगर समाजाला राज्यघटनेत स्पष्ट तरतूद असूनही आरक्षण का दिले जात नाही हा मोठा प्रश्न आहे….

Read Full News

You cannot copy content of this page