विनायक राऊत रविवारी मालवण तालुक्याच्या दौऱ्यावर…!

⚡मालवण ता.२६-:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, माजी खासदार विनायक राऊत रविवारी २८ सप्टेंबर रोजी मालवण तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.

रविवार २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आचरा बंदर येथे नवरात्र उत्सवास भेट व देवी दर्शन, सायंकाळी ५.३० वाजता आचरा हिर्लेवाडी येथे नवरात्र उत्सवास भेट व देवी दर्शन, सायंकाळी ६.०० वाजता वायंगणी येथे नवरात्र उत्सवास भेट व देवी दर्शन, सायंकाळी ६.३० वाजता तोंडवळी येथे नवरात्र उत्सवास भेट व देवी दर्शन, सायंकाळी ७.०० वाजता. हडी येथे नवरात्र उत्सवास भेट व देवी दर्शन, रात्रौ ८.०० वाजता. मालवण शहर येथे नवरात्र उत्सवास भेट व देवी दर्शन, रात्रौ. ९.०० वाजता. तारकर्ली येथे नवरात्र उत्सवास भेट व देवी दर्शन, रात्रौ. ९.३० वाजता देवबाग येथे नवरात्र उत्सवास भेट व देवी दर्शन असा त्यांचा दौरा राहणार आहे.

You cannot copy content of this page