⚡मालवण ता.२६-:
शिवशंभो सामाजिक कला, क्रीडा मंडळ, फोंडाघाट आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवभूषण’ या काव्याचे विशेष सादरीकरण सोहळा २८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता कुळदेव मंदिर, कुळाचीवाडी फोंडाघाट येथे होणार आहे. कविवर्य भूषण यांनी रचलेल्या या काव्याचे छंदात्मक सादरीकरण मालवण येथील श्री. भूषण साटम करणार आहेत. माहितीसाठी अशोक लाड (७२६३९ ८३०८१) किंवा अक्षय धुरी (७०६५५ ०११३८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘शिवभूषण’ या काव्याचे २८ सप्टेंबर रोजी फोंडाघाट येथे सादरीकरण…
