धनगर आरक्षण लढ्याला कोकणातून पाठिंबा

वैभववाडी :
जालन्यातील दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या धनगर आरक्षण लढ्याला कोकणातील वैभववाडी तालुक्यातील युवा धनगर समाज नेते सुशांत शेळके यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले की, जर राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देताना हैद्राबाद गॅजेटचा आधार घेत असेल, तर धनगर समाजाला राज्यघटनेत स्पष्ट तरतूद असूनही आरक्षण का दिले जात नाही हा मोठा प्रश्न आहे. आरक्षण हा धनगर समाजाचा घटनात्मक हक्क आहे आणि त्याची अंमलबजावणी सरकार का टाळाटाळ करत आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

सुशांत शेळके यांनी पुढे सांगितले की, राज्यातील धनगर समाजाने सरकारला सत्तेवर आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे; मात्र आता त्याच समाजाच्या हक्काकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्रातील सरकारने धनगरांचा विश्वासघात करू नये, असा इशारा त्यांनी दिला. श्री बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला कोकणातूनही भक्कम पाठिंबा आहे. सरकारने तात्काळ धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा याहूनही मोठा जनआंदोलन उभारला जाईल, असा चेतावणीपर संदेश सुशांत शेळके यांनी दिला.

You cannot copy content of this page