⚡मालवण ता.२६-:
सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षामध्ये मालवण नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना दारिद्र्य निर्मूलन योजनेंतर्गत ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आलेला आहे. मालवण नगरपालिकेकडे ज्या दिव्यांगांनी नोंदणी केली आहे, अशांनी हयातीचे प्रमाणपत्र दि. १० ऑक्टोबरपर्यंत मालवण नगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत जमा करायचे आहे. मालवण नगरपालिका हद्दीतील दिव्यांगांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा दिव्यांगांनी मालवण नगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून नोंदणी करावी, असे आवाहन नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी केले आहे.
मालवण शहरातील दिव्यांगांना हयातीचे प्रमाणपत्र जमा करण्याचे आवाहन…!
