Headlines

इन्सुलीत ठाकरे सेनेला धक्का…

दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश: आमदार केसरकर, संजू परब यांच्याकडून स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.१३-: इन्सुलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवसेना उप जिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी धक्का दिला आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे‌. यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, कृष्णा सावंत, सचिन…

Read Full News

उमेदवारीसाठी इच्छुक असुनही भाजपकडून दखल नाही ; म्हणूनच शिंदे शिवसेनेत प्रवेश …

ममता वराडकर यांनी मांडली भूमिका.. ⚡मालवण ता.१४-:मालवण नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासह नगरसेविका पदासाठी देखील मी इच्छुक म्हणून शहर भाजपाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, शहरात झालेल्या बैठकीला आणि ओरोस येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या मुलाखतीला आपल्याला भाजपाकडून बोलवलेच नाही, अशी भूमिका माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या…

Read Full News

चाचा नेहरूंच्या विचारातून मुलानी प्रेरणा घ्यावी…

न्या संपूर्णा गुंडेवाडी :जिल्हा न्यायालयाच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन साजरा.. ओरोस ता १४बालदिन हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त साजरा करतो. लहान मुलांवर अपार प्रेम करणाऱ्या नेहरु यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत. आजची मुले ही उद्याचा भारत आहेत. या महान नेत्याच्या विचारातून प्रेरणा घेण्यात यावी, असे आवाहन करतानाच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या….

Read Full News

कुडाळ न्यायालयातर्फे बॅ नाथ पै विद्यालयात बालदिन साजरा…

कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने बॅ नाथ पै विदयालय कुडाळ येथे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बालदिनाचे शिबीर कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी ए कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत करणेत आलेले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Read Full News

बांदा रोट्रॅक्ट क्लबतर्फे निमजगा येथे बालदिनानिमित्त आनंद उपक्रम…

⚡बांदा ता.१४-: बालदिनाचे औचित्य साधत बांदा रोट्रॅक्ट क्लबतर्फे अंगणवाडी निमजगा येथे लहानग्यांसोबत आनंदमयी उपक्रम आयोजित करण्यात आला. क्लबच्या सदस्यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधत विविध खेळ खेळले आणि संपूर्ण वातावरण हास्य आणि आनंदाने भरून गेले. उपक्रमाचा शेवटी मुलांना खाऊ व आकर्षक गिफ्टचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे आणि श्रीमती सावंत यांनी मोलाचे…

Read Full News

बांदा-तुळसाण पुलानजीक ओंकार हत्तीचा हल्ला; गाभण म्हशी ठार…

⚡बांदा ता.१४-: बांदा परिसरात गेले काही दिवस स्थिरावलेल्या ओंकार हत्तीने वाफोली आईरवाडी येथील मंगेश उत्तम आईर यांच्या मालकीच्या गाभण म्हशीवर बांदा तुळसाण पुलानजीक नारळ फोफळीच्या बागेत हल्ला करत तिला ठार केली. यामध्ये आईर यांचे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.ओंकार हत्ती गेले काही दिवस या भागात स्थिरावला आहे. बांदा, इन्सुली,…

Read Full News

घारपी शाळेत बालदिन विविध उपक्रमांनी बनला आनंददीन…

⚡बांदा ता.१४-: घारपी येथील जिल्हा परिषद शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्यासाठी हा दिवस आनंददायी ठरला. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांमधून चाचा नेहरूंना आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमाची सुरुवात नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि पुष्पार्पण…

Read Full News

मडुरा येथील नाबर स्कूलमध्ये उत्साहात बालदिन साजरा…

बांदा/प्रतिनिधीमडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे बालदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पं. जवाहर लाल नेहरू यांच्या प्रतिमा पुजानाने झाली.यावेळी स्थानिक समिती सदस्य सुरेश गावडे, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियांका परब, पालक परेश सावंत, मुख्याध्यापिका निती साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी…

Read Full News

डॉ. आंबेडकर नगर येथील लोंबकळणारे फ्यूज बॉक्सबंद…

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पाठपुरावा.. ⚡कुडाळ ता.१४-: शहरातील डॉ. आंबेडकर नगर पुतळा नजीकच्या पोलवरील लोम्बकळणाऱ्या धोकादायक फ्यूजना महावितरण कडून बॉक्स बसविण्यात आला आहे. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना पदाधिकारी आणि नागरिकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले होते.मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कुडाळ शहरातील नागरिक आणि शिवसेना,…

Read Full News

७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा उद्घाटन समारंभ संपन्न…

⚡ओरोस ता.१४-: दरवर्षी देशभरात दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा केला जातो. सहकारातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. या सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या., सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने हा सप्ताह पूर्ण जिल्हाभरात साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा…

Read Full News

You cannot copy content of this page