शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत..
⚡सावंतवाडी ता.०४-:
भाजप खासदार मा. नारायणराव राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून, त्यांच्या आगमनानिमित्त बांदा येथे भव्य व जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले.
राणे यांच्या स्वागतासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून भाजप व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “नारायण राणे जिंदाबाद”च्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, राणे यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असल्याचे चित्र दिसून आले.
