Headlines

सावंतवाडी नगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करणे हे आमचे प्रमुख ध्येय…

विलास जाधव: प्रभाग क्रमांक दहा मध्ये अँड अनिल निरवडेकर व विना जाधव यांनी घेतली प्रचारात आघाडी.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी नगरपालिका भ्रष्टाचारमुक्त करणे हे आमचे प्रमुख ध्येय असून यासाठी जनतेने आम्हाला एकदा संधी द्यावी. आम्ही दिलेली प्रत्येक वचनं पूर्ण करू, असा ठाम विश्वास माजी नगरसेवक विलास जाधव यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक १० मधील प्रचारादरम्यान ते बोलत…

Read Full News

भाजपची सत्ता पुन्हा आल्यास जानेवारीत सावंतवाडीत पर्यटन महोत्सव घेणार…

बबन साळगावकर यांची घोषणा:सावंतवाडी हे भयमुक्त शहर आहे आणि ते तसेच भयमुक्त ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार.. ⚡सावंतवाडी ता.२३-: भाजपची सत्ता पुन्हा आल्यास येत्या जानेवारी महिन्यात सावंतवाडीत भव्य पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते बबन साळगावकर यांनी केली. आम्ही विकासकामांवर निवडणूक लढवत आहोत आणि नागरिकांना दिलेली प्रत्येक हमी पूर्ण करू, असेही त्यांनी…

Read Full News

दीपक केसरकर देव्या सुर्याजीं,शर्वरी धारगळकर यांच्या विजयासाठी मैदानात…

सावंतवाडी : शिवसेनेचे प्रभाग ६ चे उमेदवार दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी व शर्वरी धारगळकर यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर मैदानात उतरले. त्यांनी कॉर्नर बैठक घेत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर तसेच नगरसेवकांना निवडणूक देण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, शहरात विकास सुरू आहे. भाजी मंडई, मच्छी मार्केट, मटण मार्केट, क्रिडा संकुलसह २४…

Read Full News

राष्ट्रवादीचे पक्षाचे उमेदवार अबिद नाईक यांच्या प्रचार कार्यायाचे उद्घाटन…

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूक प्रचाराला वेग आला असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचार कार्यालयांची सुरूवात करण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीनुसार प्रभाग क्रमांक १७ मधील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष व प्रभाग १७…

Read Full News

वेंगुर्ला शहरात शिवसेनेचा झंझावती प्रचार…

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला शहरात शिंदे शिवसेनेने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे यांनी बऱ्याच प्रभागात प्रचारात सक्रिय होत आपल्यासोबत बहुसंख्य नगरसेवक निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. दरम्यान आज शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी गेल्या 4 वर्षात आ. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरासाठी केलेल्या विकासात्मक कामाबाबत सविस्तर माहिती पत्रकारांना…

Read Full News

संजू परबांचा पराभव जनता नक्कीच करेल…

उदय नाईक:कोणीतरी मोठी हस्ती असल्यासारखे प्रत्येकाचा अपमान करतात.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी ही श्री देव पाटेकराची भूमी आहे, इथे अति तेथे माती नक्कीच होते. गेले काही दिवस सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब हे ज्या पद्धतीने अत्यंत गर्विष्ठ पद्धतीने वक्तव्य करीत आहेत, आपण कोणीतरी मोठी हस्ती असल्यासारखे प्रत्येकाचा अपमान करत आहे, हे सर्व पाहता त्यांना या गोष्टीचा…

Read Full News

एसआरएम कॉलेजला डॉ. किरणकुमार बोंदर यांची सदिच्छा भेट…

कुडाळ : येथील कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित मुंबई विद्यापीठ संलग्न संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे, कोकण विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थित प्राध्यापक, प्रध्यापकेतर वर्गाशी संवाद साधला.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांची महाविद्यालयास…

Read Full News

सौ. सिमरन चांदरकर व श्री. समीर चांदरकर यांची राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेसाठी निवड…

⚡मालवण ता.२३-:शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय समृद्धी कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत कला एकात्मिक अध्यापन शास्त्र स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. सिमरन…

Read Full News

भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा प्रभाग ८ मध्ये झंझावाती प्रचार…

⚡सावंतवाडी ता.२३-: भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी शहर पिंजून काढायला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतिक बांदेकर व सुकन्या टोपले यांचाही प्रचार केला. सालईवाडा भागात त्यांनी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. जनतेचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद असून भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला. यावेळी…

Read Full News

मनसेचे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.२३-:मनसे पक्षाचे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी विशाल ओटवणेकर यांच्यासह आनंद धुरी, महेश गावडे, प्रतीक ओटवणेकर, प्रशांत प्रभू, वैष्णवी ओटवणेकर, नेहा हळदणकर आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांचे विकासकार्य व मालवण शहर विकासाचा दृष्टिकोन ठेवून…

Read Full News

You cannot copy content of this page