जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीसाठी जोमाने काम करा…

बाबुराव धुरी: ठाकरे शिवसेनेची वेंगुर्ला तालुक्याची मासिक बैठक संपन्न..

⚡वेंगुर्ला ता.१२-:
वेंगुर्ला नगरपरिषद मध्ये निवडणुकीत अपयश आले असले तरी पुन्हा संघटना वाढीसाठी एकत्र येऊन जोमाने काम करूया. आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे प्रतिपादन जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.

वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना पक्षाची मासिक सभा आज सोमवारी 12 जानेवारी रोजी दुपारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम, समिधा रेडकर, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, माजी जि. प. सदस्या सुकन्या नरसुले, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, सागरतीर्थ ग्रा. पं. सदस्य ज्ञानदेव चोपडेकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, महिला तालुका संघटक साक्षी चमणकर,कोमल सरमळकर,
मनोहर येरम, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत,तुळस विभागप्रमुख संदीप पेडणेकर, उभादांडा विभागप्रमुख सुजित चमणकर, युवा उपशह्ररप्रमुख वैभव फटजी, म्हापण विभागप्रमुख विशवनाथ म्हापणकर, गजानन गोलतकर, सुहास मेस्त्री, मकरंद गोंदळेकर, विकी केरकर, मिलिंद नाईक,नारायण घाडी, तुषार सापळे, वसंत साटम, श्री. राणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक संदेश निकम, सुमन निकम, समिधा रेडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी जि. प. तसेच पं. स. निवडणूक संदर्भात उमेदवार निवडीबाबत चर्चा करण्यात आली. बाळू परब यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page