Headlines

निवृत्त कृषी पर्यवेक्षक रावजी घावरे यांचे निधन.

सावंतवाडी दि. २३:- शिरशिंगे गोठवेवाडी येथील रहिवासी रावजी लाडू घावरे वय ६५ याचे काल दुपारी त्यांचे सबनीसवाडा बिरोडकर टेब येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी कृषी पर्यवेक्षक म्हणून ३७ वर्षे सेवा बजावली होतीत्यांच्या पश्चात दोन मुलगे व दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते गेले अनेक वर्षे बिरोडकर टेब येथे वास्तवयास…

Read Full News

कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मत द्या – समीर नलावडे…

कणकवली : गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकालात कणकवली शहरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली असून रिंगरोड, गणपती साना–जाणवली जोडणारा पूल, कृत्रिम धबधबा यांसह रखडलेल्या प्रश्नांना दिशा देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम सुरू आहे. “भाजपाला मत म्हणजे विकासाला मत,” असे प्रतिपादन भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी…

Read Full News

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत रंगत वाढली ; पोलिसांचे पायी पेट्रोलिंग…

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा आता अधिकच घमघमाटात जात असून राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढू लागला आहे. वातावरण तापू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील पूर्णपणे सतर्क झाले आहे. कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक तेजस नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी शहरात पायी पेट्रोलिंग करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, हवालदार पांडुरंग पांढरे, स्टायकिंग पथकासह पोलीस…

Read Full News

हायवेवर बिबवणे येथे आढळली सात फूट लांबीची मगर…

जलद बचाव पथकाने स्थानिकाच्या मदतीने पकडले.. कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे शनिवारी मध्यरात्री एक मोठी मगर महामार्गावरून पलीकडे जात असताना बिबवणे येथील तरुणांना दिसली. त्यांनी सतर्कता दाखवून ते मगरीच्या मागावर राहिले. सर्व्हिस मार्गाकडील लोखंडी रिलिंगमुळे ती मगर पुढे न जाता साधारण पाऊण तास तेथेच थांबली. तरुणही तिच्यावर नजर ठेवून होते. सात फूट लांबीची…

Read Full News

तेंडोलीत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.२३-: तालुक्यातील तेंडोली ग्रामपंचायत आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नवोदित दुग्ध व्यावसायिकांसाठी आयोजित दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील ५५ दुग्धव्यवसायिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. तसेच दुग्ध व्यवसाय करणाऱ्या ३५ व्यावसायिकांना प्लास्टिक घमेले वाटप करून त्यांना आवश्यक साहित्याची मदत करण्यात आली.कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. सरपंच…

Read Full News

५६ व्या इफ्फीसाठी फ्लाय91 अधिकृत देशांतर्गत विमानसेवा भागीदार…

कुडाळ : गोव्यात मुख्यालय असलेली प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय91 ही गोव्यात सुरू असलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) अधिकृत देशांतर्गत विमान भागीदार आहे. हा लोकप्रिय महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित केला जात असून देशभरातून आणि जगभरातून चित्रपटप्रेमी आणि नामांकित व्यक्ती गोव्यात दाखल होत आहेत.या भागीदारीमुळे गोव्यातील दोन उपक्रम एकत्र येत…

Read Full News

निशांत तोरसकर व गीता सुखी यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता. २३-: ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार निशांत तोरसकर आणि गीता सुखी यांनी आज श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी उमेदवारांनी जनतेसमोर विकासाचं व्हिजन ठेवत कोणावरही टीका न करता सकारात्मक प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला. तोरसकर म्हणाले, “आम्ही जनतेकडे विकासाचे मुद्दे घेऊन जात आहोत. आमचं ध्येय हे…

Read Full News

सुधीर आडिवरेकर यांच्या प्रभागात पालकमंत्र्यांचा जोरदार प्रचार…

सावंतवाडी : सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणेंनी कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधला. भाजपच्या विचारांचे नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून देण्यासाठी त्यांनी आवाहन केले. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये ही बैठक झाली. भाजपच्या विचारांच सरकार देशात, राज्यात आहे‌. त्यामुळे शहरात देखील भाजप…

Read Full News

आमदार दीपक केसरकरांचा शहरात जोरदार प्रचार सुरू…

सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. कॉर्नर बैठकांवर त्यांनी भर दिला आहे‌. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांच्यासह २० ही नगरसेवक विजयी होतील असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. बाहेरचावडा परिसरात प्रभाग १ व ४ मध्ये त्यांनी जोरदार प्रचार करत आपली ताकद दाखवली. नगराध्यक्ष पदाच्या…

Read Full News

मळगाव येथील भूतनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २५ नोव्हेंबर रोजी…

⚡सावंतवाडी ता.२३-: मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे, देवीला कोंबडा अर्पण करणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात तरंगासहीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार…

Read Full News

You cannot copy content of this page