⚡बांदा ता.१२-: येथील नट वाचनालयात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास वाचनालयाचे सदस्य, मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वाचनालयाचे संचालक जगन्नाथ सातोसकर, अनंत भाटे, अशोक आईर, विजेंद्र देसाई, संजय गवस, यशवंत गवस, गोविंद बांदेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमात श्री भाटे यांनी स्वामी विवेकानंद यांचे बालपण, त्यांचे विचार व समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊ यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
यावेळी मिलिंद महाजन, नेत्रा राणे, सुजन चांदेकर तसेच वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्याशी संबंधित साहित्याचे ग्रंथप्रदर्शन मांडण्यात आले होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करताना मान्यवर.
नट वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी…
