वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी सुहास गवंडळकर यांची बिनविरोध निवड…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी विनायक ( सुहास ) सदानंद गवंडळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ही
निवड आज मंगळवारी 13 जानेवारी रोजी दुपारी वेंगुर्ला नगरपरिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे पिठासन अधिकारी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रशांत वसंत आपटे व यशवंत ( दाजी) लक्ष्मण परब यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांचा नगरपरिषद च्या वतीने शाल, श्रीफळ, झाड व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर,, सर्व नगरसेवक, कार्यालयीन अधीक्षक अभिजित पाटील, सभा अधीक्षक स्नेहल शिंदे, सभा लिपिक कोमल पावसकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास पप्पू परब,वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस शहरातील, तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page