शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेचे नगराध्यक्षांना निवेदन…

⚡सावंतवाडी ता.१३-: ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल सोमवारी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांची भेट घेत शहरातील वाढत्या वाहतुक कोंडीच्या समस्यांबाबत सविस्तर निवेदन नगराध्यक्षांना सादर केले.

या भेटीदरम्यान संघटनेच्यावतीने नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे खजिनदार जयवंत टमसाळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष यांनी शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, सुंदरवाडी रिक्षा चालक-मालक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष पॅट्रिक डिसोजा, संघटनेचे सल्लागार तसेच दोन मिनिट संघटनेचे पदाधिकारी सुनील तानावडे, राजन नवार, गुंडू सावंत उपस्थित होते. तसेच संघटनेचे अन्ना कावले, संदेश राऊळ, पटेल व आदेश नाईक आदी उपस्थित होते. दरम्यान, संघटनेचे सल्लागार व कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे सहसचिव यांनी सावंतवाडी शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांना २०१८ साली दिलेल्या वाहतूक कोंडी समस्यांवरील चार्ट सादर करून त्यावर सविस्तर चर्चा केली.

You cannot copy content of this page