भाजपकडून अँड. सिद्धार्थ भांबुरे, शिंदे शिवसेनेकडून अँड. निता सावंत कविटकर यांची नावे निश्चित..
सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड उद्या होत आहे. भाजपचे 11 आणि शिंदे शिवसेनेचे 7 नगरसेवक असल्यामुळे दोन्ही गटांचा प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक निवडला जाणार आहे. भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी अँड. सिद्धार्थ भांबुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती असून तर शिंदे शिवसेनेकडून महिला जिल्हाप्रमुख अँड ळ.निता सावंत कविटकर यांचे नाव स्वीकृत नगरसेवक पदासाठी निश्चित झाल्याचे समजते.
