⚡मालवण ता.१३-:
मालवण तालुक्यातील रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली देवस्थान नूतनीकरणाचा २६ वा वर्धापन दिन सोहळा व माघी गणेशोत्सवानिमित्त २२ ते २६ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता रेवंडी, सर्जेकोट, कोळंब, हडी, कांदळगाव पंचक्रोशीतील कलाकारांसाठी दोन गटांमध्ये नृत्य स्पर्धा होईल. छोटा गट ५ ते १५ वर्षांखालील, तर मोठा गट १५ वर्षांवरील असणार आहे. प्रथम येणाऱ्या दहा स्पर्धकांना प्रवेश मिळणार आहे अधिक माहितीसाठी ९४२२४४७०२६ यांच्याशी संपर्क साधावा.
२३ रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता अमृतनाथ दशावतार मंडळ, म्हापणचा ‘कुर्मादासाची वारी’ नाट्यप्रयोग होणार आहे. २४ रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, ११ वाजता मोफत रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबीर, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, २ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ४ वाजता कलावती आई भजन मंडळ, सर्जेकोट यांचे भजन, रात्री १० वाजता राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकप्राप्त नाटक ‘वाट चुकलो देवा’ सादर होणार आहे. २५ रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता रामेश्वर प्रॉडक्शन मुंबई निर्मित दोन अंकी संगीत नाटक ‘दुरितांचे तिमीर जावो’ सादर होणार आहे. २६ रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भद्रकाली देवस्थान मंडळ आणि ग्रामस्थ रेवंडी यांनी केले आहे.
