Headlines

सातवा वेतन आयोग ; सिंधुदुर्गातील शिक्षकांची वेतन त्रुटी दूर होण्याच्या आशा पल्लवित…

कोल्हापूर सर्किट बेंचच्या एकाच वेळी चार सचिवांना करणे दाखवा नोटीसा.. कुडाळ : सातव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करताना झालेली त्रुटी निवारण करण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी ऍड बालाजी शिंदे यांचेमार्फत कोल्हापूर खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. त्याची १ डिसेंबर रोजी कोल्हापूर सर्किट बेच येथे सुनावणी होऊन मा. न्यायालयाने शिक्षण विभाग, वित्त विभाग, ग्रामविकास…

Read Full News

कुडाळात माकडांना पकडण्यासाठी वन विभाग ऍक्शन मोड वर…

नुकसान भरपाई पंचनामे करण्यास सुरुवात:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०९-: शहरात माकडांच्या होत असलेल्या उपद्रवाबाबत वनविभाग ऍक्शन मोड वर आला आहे. आज शहरात काही ठिकाणी माकडांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. तसेच माकडांमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा वन विभागामार्फ़त करण्यात आला. यासाठी कुडाळ शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेना यांनी वनविभागाकडे पाठपुरावा केला होता.कुडाळ…

Read Full News

महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय…

१३ वर्षांच्या लढ्यानंतर ठाणे औद्योगिक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय.. ⚡कणकवली ता.०९-: महावितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या १३ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर न्याय मिळाला असून ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचारी म्हणून मान्यता दिली आहे. वेतनश्रेणी, पदोन्नती, भत्ते आणि सेवेत लागू असलेले सर्व लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत….

Read Full News

शिंदे शिवसेनेला वेंगुर्ल्यात आणखीन एक धक्का…

उपजिल्हाप्रमुखांचा राजीनामा: संजू परब यांच्याकडे राजीनामा सुपूर्त.. वेंगुर्ला प्रतिनिधी- शिंदेसेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर यांनी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनाम दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव पक्ष कार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे श्री.कोळसुलकर यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान, राजीनामा देत असलो तरी आमदार दिपक केसरकर, जिल्हा समन्वयक…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडून ‘संत सेवा’ व ज्येष्ठ वारकरी पुरस्कारासाठी अर्ज मागविले…

⚡कणकवली ता.०९-:सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने दर वर्षी दोन वारकरी ना दिल्या जाणाऱ्या’ संत सेवा पुरस्कार व जेष्ठ कीर्तनकार साठी इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत.वय वर्ष 65 पूर्ण असलेल्या ज्येष्ठानाच हा पुरस्कार दिला जातो.जेष्ठ मृदूंगमणी पुरस्कार दोन पुरस्कार,वय वर्ष 65,तसेच एक जेष्ठ वारकरी पुरस्कार वय वर्ष 80,या प्रमाणे आणखीन दोन पुरस्कार दिले जाणार आहेत….

Read Full News

उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांचा ११ रोजी नागपूर येथे मोर्चा…

सिंधुदुर्गनगरी ता ९उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठीउमेद संघटना ११ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनात २ लाख महिला व कमर्चारी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे . यासाठी नागपुर येथे एकवटले आहेत . महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत गाव पातळीवरील एकूण कार्यरत ५२ हजार समुदाय संसाधन व्यक्ती तर सद्यस्थितीत अभियानांतर्गत कार्यरत…

Read Full News

उपसरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे दत्ताराम कोळमेकर विजय…

⚡सावंतवाडी ता.०९-: माडखोल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात घेतलेल्या निवडणुकीत भाजपचे दत्ताराम कोळमेकर यांनी अटीतटीच्या लढतीत बहुमत मिळवत विजय संपादन केला.या निवडणुकीत दत्ताराम कोळमेकर यांनी ७ विरुद्ध ५ मतांनी विरोधी पॅनेलचा पराभव करत उपसरपंच पदावर निवड झाली. कोळमेकर यांचा सामना अनिता अनिल राऊळ यांच्याशी झाला होता. गेल्या २० वर्षांपासून माडखोल ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता प्रस्थापित…

Read Full News

रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिक तरुणाने परत केले…

⚡मालवण ता.०९-:मालवण वायरी येथील रेकोबा घाटी रस्त्यावर सापडलेले १० हजार रुपये असलेले पाकीट गावातील निखिल तळगावकर या प्रामाणिक तरुणाने मालकास परत केले. निखिल तळगावकर यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. रेकोबा घाटी रस्त्यावर एक पैशाचे पाकीट निखिल तळगावकर यांना आढळले. पाकिटात १० हजार रुपये असल्याचे दिसताच निखिल यांनी तत्काळ हे पाकीट सामाजिक कार्यकर्ते श्री….

Read Full News

ओझर विद्यामंदिरमध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न..

⚡मालवण ता.०९-:कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर प्रशालेमध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. फायर ॲण्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबईचे ट्रेनर संजय मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रथमोपचार या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीकडे असावयास असणारे गुण, प्रथमोपचार करण्याचे उद्देश, बँडेजचे प्रकार व बँडेज बांधण्याच्या पद्धती, रक्त थांबवण्यासाठी जखमेवर करावयाचे प्रथमोपचार, फ्रॅक्चरचे प्रकार व फ्रॅक्चर…

Read Full News

चौके येथील भराडी देवी मंदिर परिसराची श्रमदानातून स्वच्छता…

ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांचा सहभाग.. ⚡मालवण ता.०९-:शासनाच्या स्वच्छोत्सव उपक्रमांतर्गत मंदिर परिसराची श्रमदानातून स्वच्छता करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना प्राप्त सूचनेनुसार चौके ग्रामपंचायतीच्या वतीने चौके येथील श्री देवी भराडी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या शिबिरात ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, देवस्थान कमिटी पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्था यांच्या श्रमदानातून मंदिर परिसर स्वच्छ करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page