न्हावेली पंचायत समिती मतदारसंघातून अक्षय पार्सेकर यांची माघार..

⚡सावंतवाडी ता.२७-: न्हावेली गावचे उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख सावंतवाडी अक्षय पार्सेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पंचायत समिती सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला होता. गावाच्या विकासासाठी त्यांनी आजपर्यंत केलेली विविध कामे तसेच शिवसेनेचे जिल्हास्तरीय नेते संजू परब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पार्सेकर यांना सरकारी कमिटीमध्ये योग्य स्थान देण्याचे ठाम आश्वासन दिले. संजू परब आणि केसरकर यांच्या शब्दावर विश्वास ठेवून अक्षय पार्सेकर यांनी न्हावेली पंचायत समिती निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना पार्सेकर यांनी सांगितले की, “शिवसेना हा माझा परिवार आहे. पक्षाने दिलेल्या आश्वासनावर माझा पूर्ण विश्वास असून यापुढेही मी शिवसेनेच्या माध्यमातून न्हावेली गावाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी निष्ठेने काम करत राहीन.”
पार्सेकर यांच्या या निर्णयामुळे न्हावेली परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून, पक्षनिष्ठेला प्राधान्य देणारा निर्णय म्हणून त्यांच्या भूमिकेकडे पाहिले जात आहे.

You cannot copy content of this page