Headlines

सावंतवाडीतील महिलेचा कारवारच्या समुद्रकिनाऱ्यावर आदळला मृतदेह…

⚡सावंतवाडी, ता.२७-: येथे राहणाऱ्या परप्रांतीय महिलेचा कारवार येथील समुद्रकिनाऱ्यावर मृतदेह आढळून आला आहे. तिचा खून केला असावा, असा कारवार पोलिसांचा संशय असून त्यानुसार अधिक तपासासाठी तेथील पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले आहे. ही घटना २२ तारखेला घडली आहे. दरम्यान खुन व अधिक माहितीच्या शोधात पोलिस सावंतवाडीत दाखल झाले आहे.

Read Full News

खासदार नारायण राणे यांची हरकत नसेल तर त्यांचे फोटो लावणं वावगं ठरणार नाही…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्या कार्यालयात भाजपच्या नेत्यांचे फोटो आणि पक्षाच चिन्ह हटविले:समीर नलावडे काही तासांतच भाजपच्या लोकांवर कृतघ्न झाले,कन्हैया पारकर यांचा सणसणीत टोला.. ⚡कणकवली ता.२७-: काल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले कणकवली नगरपंचायत मधील नगराध्यक्ष दलनातील खास. नारायण राणे यांचे फोटो काढले गेले. आम्ही राणेंच्या विचाराधारेपासून बाजूला झालो होतो. नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकर…

Read Full News

नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांचे आमदार दीपक केसरकरांकडून अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया आणि सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवूया, असा विश्वास आमदार केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी दिमाखदारपणे संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने व स्वागत समारंभाने बॅरिस्टर नाथ पै सभागृहात या भव्य सोहळ्यास प्रारंभ झाला.यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मधील प्रशालेच्या शिष्यवृत्तीधारकांचे सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले तसेच इयत्ता दहावीची विद्यार्थीनी कु पुर्वा प्रसाद…

Read Full News

ओसरगाव ग्रामस्थांनी दिल्या नगराध्यक्ष संदेश पारकर याना शुभेच्छा…

कणकवली : जनतेच्या मनातील राजा माणूस आणि हक्काचा माणूस म्हणून संदेश पारकर यांच्याकडे पाहिले जाते. आज ओसरगाव येथे याची प्रचिती आली. संदेश पारकर हे अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून संदेश पारकर हे निवडून आले आणि जनतेच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. कणकवलीत आनंदोत्सव…

Read Full News

सावंतवाडी परीट समाजातर्फे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी उत्सहात साजरी*

⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे परीट समाजातर्फे काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भरगच्च कार्यक्रमात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी आठ वाजता एसटी स्टँड परिसर,काझी शहाबुद्दीन परिसर व प्रांत ऑफिस परिसर येथे साफसफाई करण्यात आली व त्यानंतर नऊ वाजता संत…

Read Full News

विशाल परब यांनी केली भाजपच्या माध्यमातून तेंडोली येथील कुटुंबियांस 25 हजार रुपयांची आर्थिक मदत…

⚡वेंगुर्ला ता.२७-: तालुक्यातील मठ येथील मठ कुडाळतिठा येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात मदन मेस्त्री (रा. तेंडोली,ता. कुडाळ ) यांचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळताच भाजपा व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून अपघातात मृत्यू झालेल्या मदन मेस्त्री यांच्या कुटुंबियांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मठ येथील कुडाळ तिठ्यावर झालेल्या भीषण अपघातात…

Read Full News

पिंगुळीतील अपघातात बाईकस्वार जखमी…

⚡कुडाळ ता.२७-: मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळी नागरीकांची गर्दी झाली होती.

Read Full News

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संस्मरणीय…

विद्यार्थी-प्राध्यापकांनी जागविल्या जुन्या आठवणी:सन २००० बॅचचा रौप्य महोत्सवी सोहळा.. कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आयडियल कॉलेज म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या अशा उपक्रमांस…

Read Full News

मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीला चॅम्पियनशिपकणकवली येथे जिल्हास्तरीय स्पर्धा…

⚡कणकवली ता.२६-: तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमी आणि प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलचे संस्थापक अध्यक्ष संदिप रघुनाथ चौकेकर यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा चिल्ड्रेन आणि सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा २०२५ येथील नगरवाचनालय सभागृहात झाली. यामध्ये मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमी ने १८ सुवर्ण पदक, १० रौप्य पदक ,४ कास्य पदक मिळवून…

Read Full News

You cannot copy content of this page