Headlines

विशाल परब यांनी केली भाजपच्या माध्यमातून तेंडोली येथील कुटुंबियांस 25 हजार रुपयांची आर्थिक मदत…

⚡वेंगुर्ला ता.२७-: तालुक्यातील मठ येथील मठ कुडाळतिठा येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात मदन मेस्त्री (रा. तेंडोली,ता. कुडाळ ) यांचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळताच भाजपा व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून अपघातात मृत्यू झालेल्या मदन मेस्त्री यांच्या कुटुंबियांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मठ येथील कुडाळ तिठ्यावर झालेल्या भीषण अपघातात…

Read Full News

पिंगुळीतील अपघातात बाईकस्वार जखमी…

⚡कुडाळ ता.२७-: मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळी नागरीकांची गर्दी झाली होती.

Read Full News

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संस्मरणीय…

विद्यार्थी-प्राध्यापकांनी जागविल्या जुन्या आठवणी:सन २००० बॅचचा रौप्य महोत्सवी सोहळा.. कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आयडियल कॉलेज म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला.क.म.शि.प्र.मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या अशा उपक्रमांस…

Read Full News

मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीला चॅम्पियनशिपकणकवली येथे जिल्हास्तरीय स्पर्धा…

⚡कणकवली ता.२६-: तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमी आणि प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलचे संस्थापक अध्यक्ष संदिप रघुनाथ चौकेकर यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा चिल्ड्रेन आणि सबज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा २०२५ येथील नगरवाचनालय सभागृहात झाली. यामध्ये मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो आणि फिटनेस अकॅडमी ने १८ सुवर्ण पदक, १० रौप्य पदक ,४ कास्य पदक मिळवून…

Read Full News

कणकवलीत बाजारादिवशी वृद्धाच्या ताब्यातील 1 लाखाची रोकड लंपास…

कणकवली : कणकवली बाजारपेठेत सैनिक पतसंस्थेतून 1 लाखाची रक्कम काढल्यानंतर ती घेवून जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडील शबनम पिशवीत 500 रूपयांच्या 100 नोटा असलेली 50-50 हजाराची दोन बंडले हातचलाखीने लंपास केली. याप्रकरणी ज्यांचे पैसे चोरीस गेले ते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शशिकांत शंकर साटम (रा. कणकवली, शिवाजीनगर) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार…

Read Full News

हुमरमळा (वालावल) तील जलजीवनची कामे पैशांअभावी अपूर्ण…

ठेकेदारांचे पैसे न मिळाल्यास जि प सीईओ दालनात ठिय्या:ठाकरे सेनेच्या अतुल बंगे यांचा इशारा.. कुडाळ : हुमरमळा-वालावल गावातील जलजीवन योजनेंतर्गत काही कामे अपुर्ण राहीलेली आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले असुन येत्या पंधरा जानेवारी पर्यंत अडकवलेले पैसे मिळाले नाहीत तर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात अचानक ठाण मांडुन आंदोलन करणार…

Read Full News

कोकण कला’च्या स्पर्धेत पाट हायस्कूलचे उल्लेखनीय यश..

कुडाळ : कोकण कला आणि शिक्षण केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने चित्रकला, पोस्टर बनविणे, वक्तृत्व, निबंध, वेशभूषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सर्व कलाप्रकारात पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.यामध्ये चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक सोहनी संदीप साळस्कर, वेशभूषा स्पर्धा द्वितीय क्रमांक दीक्षा मराळ. द्वितीय क्रमांक मिळालेल्या समूह नृत्य स्पर्धेत दिशा सामंत, आर्या चांदेकर , निधी…

Read Full News

गोव्यात नोकरीच्या आमिषाने ५०० जणांना २.९० कोटींचा गंडा; सावंतवाडीतील तिघांना अटक…

सावंतवाडी : गोव्यातील कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात म्हणून सिंधुदुर्गातील तरुण त्या मिळवण्यासाठी मोठी धडपड करतात. यातील काहीजणांना कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळते. पण, काही कंपन्या त्यांना कशा त्रासात घालतात, याचं ताजं उदाहरण गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेनं उघडकीस आणलंय. एका कंपनीनं सिंधुदुर्गातील दोन तरुण आणि एका तरुणीच्या माध्यमातून गोव्यातील तब्बल ५०० जणांना २ कोटी ९०…

Read Full News

घारपी शाळेत वीर बाल दिवस उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२६-: घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वीर बाल दिवस विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, त्याग व देशभक्तीची भावना रुजावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांनी वीर बाल दिवसाचे महत्त्व विशद केले. अल्पवयातच धर्म व देशासाठी बलिदान देणाऱ्या साहिबजाद्यांचे शौर्य विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण…

Read Full News

बांदा येथे दोन दिवसीय आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.२६-: बांदा येथील खेमराज हायस्कूलच्या पटांगणावर दोन दिवस चाललेल्या बांदा नवभारतच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात सर्वात अधिक पारितोषिके मिळवणाऱ्या बांदा खेमराज हायस्कूलला सर्वसाधारण विजेतेपद तर भेडशी हायस्कूलला उपविजेतेपद प्राप्त झाले. पुढील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यश प्राप्त केले.१४ वर्षाखालील मुलगे गटात पुढील मुलांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. १००मिटर धावणे – मंजुनाथ…

Read Full News

You cannot copy content of this page