उपजीविकेच्या साधनाबरोबर छंदही जोपासा…

राजन नाईक :बॅ नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात..

⚡कुडाळ ता.१६-: उपजीविकेच्या साधनाबरोबर छंदही जोपासा. कलेची साधना करा. जगण्याचे मर्म सापडेल. असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार राजन नाईक यांनी काढले. बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या कलासंगम या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून श्री. नाईक बोलत होते. अतिशय उत्साहात कालसंगम स्नेहसंमेलन संपन्न झाले.
बॅ नाथ पै फिझिओथेरपी महाविद्यालयाचे कलासंगम स्नेहसंमेलन अलीकडेच उत्साहात संपन्न झाले. या स्न्हेहसंमेलनाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार राजन नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाला. यावेळी यावेळी व्यासपीठावर उमेश गाळवणकर, संस्था सी ई ओ अमृता गाळवणकर, फिजिओथेरपीचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल,नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, उप प्राचार्य वैशाली ओटवणेकर, बॅरिस्टर नाथ पै सीनियर कॉलेजचे प्राचार्य अरुण मर्गज,बॅ.नाथ पै बीएड कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर,पल्लवी कामत, सायली वारंग व उमेश गाळवणकर यांचे आई वडील उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजन नाईक म्हणाले, आपले अध्ययन -अध्यापन करत असताना तणामुक्तीसाठी एखादे कौशल्य आत्मसात करा. जगण्याची उर्मी वाढेल. भावी डॉक्टर स्नेहसंमेलनात मुक्तपणे अनेक कला कलात्मकतेने सादर करण्याद्वारे व्यक्त होत आहेत, ही फार समाधानाची गोष्ट आहे. त्यासाठी बॅ नाथ पै शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनरुपी व्यासपीठ उपलब्ध करून देते ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आपण आहात त्या क्षेत्रामध्ये अनेक आव्हान असतात त्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जा. दुसऱ्यांच्या वेदना दूर करत असताना आपल्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना वेदना मुक्तीचा आनंद देऊन जातो याचे भान ठेवा. एखाद्या परिस्थितीशी संघर्ष करावा लागला तर त्यानंतर मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो. आपण डॉक्टरी पेशाकडे व्यावसायिक हेतूने न बघता सामाजिक बांधिलकीच्या नात्याने, मानवसेवेचे व अर्थार्जनाचे एक उत्तम साधन म्हणून पहा. आणि जीवनातील तणाव मुक्तीसाठी अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हा. आनंद द्या. आनंद घ्या. यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ.प्रत्युष रंजन बिस्वाल यांनी विद्यार्थ्यांनी या दैनंदिन तणावपूर्ण जीवनातून बाहेर पडून स्वच्छंदपणे, मुक्तपणे अभिव्यक्त होण्यासाठी या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले असल्याचे सांगत अतिशय उत्कृष्टपणे आपल्यातील कलेचा कलासंगम केल्याचे सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून तेथील संस्कृती व परंपरा घेऊन आलेल्या भावी डॉक्टर विद्यार्थ्यांनी या संमेलनरुपी कलासंगमचा आनंद घेत असताना अतिशय कलात्मकतेने व अतिशय जुन्या नव्याचा सुरेख संगम साधत स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अरुण मर्गज यांनी केले. अहवालाचं वाचन प्रा.वैशाली ओटवणेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार व सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले.

You cannot copy content of this page