Headlines

वीज कंत्राटी कामगारांनी एकत्र यावे, गटबाजी टाळावी…

अशोक सावंत: महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच अधिवेशन उत्साहात संपन्न… ⚡कुडाळ ता.१९-: आपण नशिबाला दोष न देता नशीब सोबत घेऊन पुढे गेल्यास यश दूर नाही अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे महावितरण कामगारांवर अन्याय झाला त्यावेळी आम्ही संघटितपणे लढा दिला व यशस्वी झालो भविष्यात सर्वांनी गटबाजी न करता एकत्र यावे असे प्रतिपादन वीजवितरण कंत्राटी कामगारांचे नेते…

Read Full News

आरोग्य उपसंचालकांनी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मागीँ लावावेत…

प्रकाश आबिटकर: कृती समितीने वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता..१९-: उप जिल्हा सावंतवाडीतील ट्रामा केअर युनिट, आय.सी.यु., रक्तपेढी, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त यांसर्भात तातडीने सोडवा असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आरोग्य डॉ. दिलीप माने यांना दिले.सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीचे निमंत्रक रविंद्र ओगले, माडखोल माजी सरपंच संजय लाड, मल्टीस्पेशालिटी जागा मालक रविंद्र केरकर,…

Read Full News

मळगाव येथील सुमन खडपकर यांच्या निवासस्थानी २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सव…

⚡सावंतवाडी ता.१९-: तालुक्यातील मळगाव येथील सुमन झिलू खडपकर यांच्या निवासस्थानी विराजमान असलेल्या एकदंती श्री वन विनायकाच्या स्थळी दरवर्षीप्रमाणे गुरुवार २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.सुमन खडपकर यांना सन २००० साली जंगलात एकदंती लाकडी गणेशमूर्ती आढळून आली होती. सदर गणेशमूर्ती त्यांनी आपल्या घरी आणून तिला स्थापित करून विधिवत पूजन सुरू केले….

Read Full News

प्रभाग क्रमांक ६ मधील नागरी समस्यांवर न.प. प्रशासन ॲक्शन मोडवर…

नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पुढाकाराने तातडीच्या उपाययोजना.. सावंतवाडी ता.१९-:प्रभाग क्रमांक ६ मधील गंभीर नागरी समस्यांबाबत नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून नगरपरिषदेचे अधिकारी ॲक्शन मोडवर आले असून, बांधकाम व आरोग्य विभागामार्फत तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे तुषार सरडे, विठ्ठल कशाळीकर तसेच आरोग्य विभागाचे विनोद सावंत, दीपक म्हापसेकर यांनी प्रभागातील सर्व नाल्यांवरील वाढलेली झाडी…

Read Full News

मळगाव येथे २६ रोजी तालुकास्तरीय कराओके गायन स्पर्धा…

उदय जामदार अचानक ग्रुप मित्र मंडळ व अचानक महिला मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव येथील खानोलकर मंगल कार्यालय येथे सोमवार २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४.०० वाजता सावंतवाडी तालुकास्तरीय कराओके गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उदय जामदार अचानक ग्रुप मित्र मंडळ व अचानक महिला मैत्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या…

Read Full News

युवाशक्तीचा जल्लोष : दोडामार्गात अभाविप आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा…

दोडामार्ग :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग यांच्या ‘सिंधुशौर्य’ अभियानांतर्गत शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) सरगवे येथील देव खंडोबा मंदिर परिसरात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.स्पर्धेत यंगस्टार कणकवली संघाने प्रथम, तर जय मानसिश्वर वेंगुर्ला संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट पकडपटू, उत्कृष्ट चढाईपटू व अष्टपैलू खेळाडूंना विशेष पारितोषिके देण्यात…

Read Full News

देवगड तालुका जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धा उत्साहात कुडाळच्या ऐश्वर्या चव्हाण प्रथम…

⚡देवगड ता.१८-: रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि कराओके कलाप्रेमी सिंगिंग क्लब देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत कुडाळ येथील ऐश्वर्या चव्हाण यांनी प्रथम क्रमांक तर आदित्य आचरेकर कुडाळ यांनी द्वितीय, तर वैष्णवी चव्हाण वेंगुर्ला हे तृतीय क्रमांक मिळविला उत्तेजनार्थ बक्षीसासाठी वेंगुर्ला येथील भूषण तुळसकर…

Read Full News

महायुतीत पूर्ण एकमत…

आ. निलेश राणे: जिल्हा परिषदेच्या सर्व ५० जागांवर महायुतीचा झेंडा फडकेल.. कणकवली : खासदार नारायण राणे यांनी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणत त्यांचे एकमत घडवून आणले असून, त्यातूनच महायुतीची युती झाली आहे. अतिशय चांगल्या आणि सकारात्मक वातावरणात चर्चा पार पडली. जिल्हा परिषदेच्या सर्व ५० जागांवर महायुतीचा झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास आमदार निलेश राणे यांनी…

Read Full News

यशवंत उर्फ बाळू परब यांच्या राजीनाम्यामुळे तमाम शिवसैनिकांना धक्का…

⚡वेंगुर्ला ता१८-: वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत ( बाळू) सुभाष परब यांनी आज रविवार 18 जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव पक्षाच्या कार्यासाठी वेळ देऊ शकत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याकडे दिलेल्या अर्जात म्हटले आहे. त्यांनी सभापतीपद तसेच गेली सहा वर्षे तालुकाप्रमुख ही जबाबदारी सांभाळताना संघटना…

Read Full News

*भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘डॅझेलिया 2026’ उत्साहात

⚡सावंतवाडी ता.१८-: भोसले नॉलेज सिटीचे बहुप्रतीक्षित वार्षिक स्नेहसंमेलन ‘डॅझेलिया 2026’ काल अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. संस्थेअंतर्गत कार्यरत सर्व महाविद्यालयांचा एकत्रित सहभाग असलेले हे स्नेहसंमेलन प्रथमच एवढ्या भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी तसेच यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल या संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक…

Read Full News

You cannot copy content of this page