तीन संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात:आणखी दोन संशयितांना ताब्यात घेऊन पथक कणकवलीकडे रवाना ; सूत्रांची माहिती..
⚡कणकवली ता.२९-: श्रीनिवास रेड्डी (५३, रा. बेंगलोर कर्नाटक) यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) व कणकवली पोलिसांच्या पथकाने बेंगलोर गाठून सोमवारी रात्रीच्या सुमारास तीन संशयितांना ताब्यात घेऊन कणकवली येथे आणण्यात आले आहे.
सदरची मर्डर केस हाय प्रोफाईल असून तीन आरोपींममागोमाग पोलिसांच्या आणखी एका पथकाने अजून दोन संशयितांना ताब्यात घेऊन कणकवली कडे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे या प्रकणात नक्कीच आरोपींची संख्या वाढणार अल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह साळीस्ते येथे महामार्गानजीक गणपती सान्याच्या पायरीवर खून झालेल्या स्थितीत आढळला होता. त्याच दिवशी श्रीनिवास रेड्डी यांच्या आईच्या नावे असणारी कार दोडामार्ग तालुक्यात आढळली होती व त्या कारमध्ये रक्ताचे डाग होते. पोलीस तपासामध्ये मृतदेह व कार यांचे ‘कनेक्शन’ स्पष्ट झाल्यानंतर एलसीबी व कणकवली पोलीस अशी दोन पथके तपासासाठी बेंगलोरला रवाना झाली होती. गेले तीन दिवस ही पथके बेंगलोर येथे आरोपींचा शोध घेत होती. अखेरीस सोमवारी रात्रीच्या सुमारास तीन आरोपींना एलसीबीच्या पथकाने गजाआड केले.
सद्यस्थितीत हा खून ‘प्रॉपर्टी’च्या वादातूनच झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. तर हा खून साळीस्ते येथेच झाला असावा, संशयितांनी श्रीनिवास रेड्डी यांना ठार केल्यानंतर त्यांचा मृतदेह साळीस्ते येथेच टाकला व रेड्डी यांच्या ताब्यातील कार दोडामार्ग येथे सोडून ते पळाले असावेत, असाही अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
