मळगाव इंग्लिश स्कूलची समीक्षा वरक हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड…

सावंतवाडी ता.२९-: मळगाव इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा जानु वरक हिने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ओरोस यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय १५०० मीटर धावणे या प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिच्या या यशामुळे तिची पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


या तिच्या यशाबद्दल मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ व माजी विद्यार्थी परिवरातर्फे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page