मालवण तालूका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ३० रोजी बैठक…

⚡मालवण ता.२८-:
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या मालवण तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वा. मालवण बाजारपेठेतील हॉटेल मालवणी हेरिटेज येथे आयोजित करण्यात आली आहे.

आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणूकांबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत माहिती देणे तसेच विविध मतदारसंघात इच्छुक असलेल्या उमेदवार यांचे अर्ज मागवून घेणे याबाबत ही बैठक आयोजित केली आहे. तरी या बैठकीस मालवण तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस यांनी केले आहे.

You cannot copy content of this page