मळगाव रवळनाथ मंदिरातील वार्षिक जागर उत्सवास कोजागिरी पौर्णिमेपासून प्रारंभ…

⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील वार्षिक जागर उत्सवास कोजागिरी पौर्णिमेपासून मोठ्या भक्तीभावाने प्रारंभ झाला आहे. महिनाभर चालणाऱ्या या जागर उत्सव कालावधीत दररोज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरू असलेल्या या जागर कालावधीत दर दिवशी मंदिरात पुराणवाचन व मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढली जाते. पालखीनंतर उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप करण्यात येते. तसेच दरदिवशी पालखी नंतर मळगावातील स्थानिक किंवा आमंत्रित भजन मंडळे आपली भजने सादर करतात. त्रिपुरारी पौर्णिमेला रवळनाथ देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाने या जागराची सांगता केली जाते. यंदा रवळनाथ देवाचा जत्रोत्सव ५ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या जत्रोत्सवानंतर गावातील जत्रोत्सवास प्रारंभ होतो.

You cannot copy content of this page