Headlines

एसआरएम कॉलेजचा माजी विद्यार्थी गोपाळ सावंतची सीआरपीएफ मध्ये निवड…

महाविद्यालय-संस्थेतर्फे सत्कार:कठोर मेहनत आणि जिद्दीमुळे यश.. ⚡कुडाळ ता.१८-: येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाचा आणि मराठी विभागाचा माजी विद्यार्थी गोपाळ सत्यवान सावंत याची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड झाली असून ही बाब महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. गोपाळ सावंत हा २०२३–२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी असून, त्याने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर हे…

Read Full News

बांदा येथील खेमराज प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ. सान्वी सावंत यांचे निधन…

⚡बांदा ता.१८-: बांदा- देऊळवाडी येथील खेमराज प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ. सान्वी संतोष सावंत (वय ४६) यांचे आज शनिवारी रोजी सकाळी ७.१५ वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. आज दुपारी येथील मोर्ये स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बांदा येथील प्रसिद्ध वास्तूविशारद संतोष विनायक सावंत यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत…

Read Full News

श्री सद्गुरू राजाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त इन्सुलीत तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: इन्सुली गावठणवाडी येथील श्री सद्गुरू राजाराम महाराज मठ येथे महाराजांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पालखी सोहळा, भजनांचे कार्यक्रम आणि मालवणी नाटकाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.​उत्सवाची सुरुवात २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता होईल. श्री सद्गुरू राजाराम महाराजांच्या स्मारकाकडून त्यांच्या निवासस्थानापर्यंत नामघोषात पालखी…

Read Full News

माघी गणेश जयंतीनिमित्त इन्सुलीत धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: इन्सुली खामदेव नाका येथील गणेश मंदिर, इन्सुली येथे ‘नवदूर्गा कला क्रीडा मंडळ’ आणि समस्त कुडवटेंब ग्रामस्थ यांच्या वतीने यंदाचा ‘माघी गणेश जयंती’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. २१ जानेवारी आणि गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…

Read Full News

वेंगुर्ला येथे मच्छीविक्रेत्या महिलांचे मासे कचऱ्याच्या गाडीत टाकल्याने मच्छिमार बांधव आक्रमक…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला सुंदरभाटले ( ठाकरे शिवसेना कार्यालय समोर )येथे आज रविवारी दुपारी मच्छीविक्रीस बसलेल्या महिला व्यावसायिक यांच्या मासे च्या टोपल्या कर्मचाऱ्याकडून चक्क कचऱ्याच्या गाडीत टाकण्यात आल्याने महिला घाबरून गेल्या. यावेळी माहिती मिळताच त्वरित उभादांडा सरपंच निलेश चमणकर, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश परुळेकर, मच्छिमार नेते दादा केळूसकर व वसंत तांडेल, वाल्मिकी कुबल, गणेश नार्वेकर, गजा…

Read Full News

नट वाचनालयातील हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१८-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून येथील अंकुश माजगावकर व परिवार पुरस्कृत शालेय मुलांसाठी येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर होते. यावेळी सचिव राकेश केसरकर, संचालक प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोसकर, शंकर नार्वेकर, जि. प. पीएमश्री केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, अजित नाईक…

Read Full News

आरोंदा येथे माघी गणेश जयंती निमित्त २२ व २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१८-: आरोंदा येथे श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिरात गणेश जयंती निमित्त २२ व २३ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले असून,गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता गणेश मूर्तीचे आगमन ,सकाळी ९:०० ते १० :०० वाजता श्रींची पूजा ,अभिषेक ,दुपारी १२ :०० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १:०० ते ३:०० वा.महाप्रसाद, सायंकाळी ३:०० ते…

Read Full News

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुतीतच होणार…

खासदार नारायण राणे यांनी केले स्पष्ट:जिल्हा परिषदेच्या 31 जागा भाजप तर शिवसेना 19 जागा लढणार.. कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या व घातलेल्या निवडणुकांच्या जागा वाटपंबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये जागावाटप करण्यात…

Read Full News

दोडामार्ग–माटणे मतदारसंघात रविकिरण गवस आघाडीवर…

⚡दोडामार्ग ता.१७-: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. अल्प कालावधीत त्यांनी ५० हून अधिक आंदोलने करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. खोक्रल गावचे मूळ रहिवासी व पुण्यातील यशस्वी उद्योजक असलेले गवस सध्या दोडामार्ग–माटणे मतदारसंघात २४x७ सक्रिय आहेत. संघटन मजबूत करत त्यांनी राष्ट्रवादीला नवसंजीवनी दिली आहे.नुकत्याच चर्चेनंतर…

Read Full News

शरीरसौष्ठव ही ईश्वराची देणगी, तिची जपणूक हा युवाधर्म…

विशाल परब:शिरोडा येथे आयोजित फोर्ज क्लासिक 2026 बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला उस्फुर्त प्रतिसाद.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: आजच्या धकाधकीच्या युगात शरीरसौष्ठव जपणे ही काळाची गरज असून, परमेश्वराने दिलेल्या या देणगीची योग्य ती जपणूक करणे हा युवकांचा धर्म आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल परब यांनी केले.महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स…

Read Full News

You cannot copy content of this page