Headlines

जागृती मंडळामुळेच वेंगुर्ल्याची क्रीडा-सांस्कृतिक चळवळ समृद्ध…

नगरसेवक रवींद्र शिरसाट:३७ व्या जागृती क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन.. ⚡वेंगुर्ला ता.१८- जागृती मंडळाने नेहमीच लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम सुरू ठेऊन एक फार मोठी कला क्रीडा सांस्कृतिक चळवळ उभी केली आहे. गेली ४० वर्षे है मंडळ वेंगुर्ल्यात सक्रिय आहे. अनेकजण जागृतीच्या व्यासपीठावरूनच मोठे होऊन विविध हुद्द्यावर कार्यरत आहेत. जागृतीसारख्या मंडळांमुळेचवेंगुर्ल्यातील सांस्कृतिक व क्रीडा विश्व समृद्ध…

Read Full News

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत स्थिर नियंत्रण पथक तैनात…

वाहनांची केली जातेय कसून तपासणी.. ⚡कणकवली ता.१८-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी स्थिर नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकांमार्फत सीमावर्ती भागातून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेवर काटेकोर नजर ठेवली जात आहे. निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार, आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध मद्य,…

Read Full News

बालवाडी म्हणजे शिक्षणाची पहिली पायरी…

सौ. सई काळप:सावंतवाडी संस्थांनच्या बालवाडीचे स्नेहसंमेलन उत्साहात.. ⚡कुडाळ ता.१८-: बालवाडी ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. इथे फक्त मुलांना अक्षर ओळखच शिकवले जात नाही, तर शिस्त, सवयी व संस्कार शिकवले जातात, असे प्रतिपादन कुडाळ नगरपंचायत नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या सई काळप यांनी केले. सावंतवाडी संस्थांनच्या बालवाडी स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या.सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित भगिनी मंडळ…

Read Full News

एसआरएम कॉलेजचा माजी विद्यार्थी गोपाळ सावंतची सीआरपीएफ मध्ये निवड…

महाविद्यालय-संस्थेतर्फे सत्कार:कठोर मेहनत आणि जिद्दीमुळे यश.. ⚡कुडाळ ता.१८-: येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाचा आणि मराठी विभागाचा माजी विद्यार्थी गोपाळ सत्यवान सावंत याची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये निवड झाली असून ही बाब महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. गोपाळ सावंत हा २०२३–२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी असून, त्याने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर हे…

Read Full News

बांदा येथील खेमराज प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ. सान्वी सावंत यांचे निधन…

⚡बांदा ता.१८-: बांदा- देऊळवाडी येथील खेमराज प्रशालेच्या माजी शिक्षिका सौ. सान्वी संतोष सावंत (वय ४६) यांचे आज शनिवारी रोजी सकाळी ७.१५ वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. आज दुपारी येथील मोर्ये स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बांदा येथील प्रसिद्ध वास्तूविशारद संतोष विनायक सावंत यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत…

Read Full News

श्री सद्गुरू राजाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त इन्सुलीत तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: इन्सुली गावठणवाडी येथील श्री सद्गुरू राजाराम महाराज मठ येथे महाराजांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पालखी सोहळा, भजनांचे कार्यक्रम आणि मालवणी नाटकाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.​उत्सवाची सुरुवात २० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता होईल. श्री सद्गुरू राजाराम महाराजांच्या स्मारकाकडून त्यांच्या निवासस्थानापर्यंत नामघोषात पालखी…

Read Full News

माघी गणेश जयंतीनिमित्त इन्सुलीत धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.१८-: इन्सुली खामदेव नाका येथील गणेश मंदिर, इन्सुली येथे ‘नवदूर्गा कला क्रीडा मंडळ’ आणि समस्त कुडवटेंब ग्रामस्थ यांच्या वतीने यंदाचा ‘माघी गणेश जयंती’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. २१ जानेवारी आणि गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…

Read Full News

वेंगुर्ला येथे मच्छीविक्रेत्या महिलांचे मासे कचऱ्याच्या गाडीत टाकल्याने मच्छिमार बांधव आक्रमक…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला सुंदरभाटले ( ठाकरे शिवसेना कार्यालय समोर )येथे आज रविवारी दुपारी मच्छीविक्रीस बसलेल्या महिला व्यावसायिक यांच्या मासे च्या टोपल्या कर्मचाऱ्याकडून चक्क कचऱ्याच्या गाडीत टाकण्यात आल्याने महिला घाबरून गेल्या. यावेळी माहिती मिळताच त्वरित उभादांडा सरपंच निलेश चमणकर, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख शैलेश परुळेकर, मच्छिमार नेते दादा केळूसकर व वसंत तांडेल, वाल्मिकी कुबल, गणेश नार्वेकर, गजा…

Read Full News

नट वाचनालयातील हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१८-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून येथील अंकुश माजगावकर व परिवार पुरस्कृत शालेय मुलांसाठी येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर होते. यावेळी सचिव राकेश केसरकर, संचालक प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोसकर, शंकर नार्वेकर, जि. प. पीएमश्री केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, अजित नाईक…

Read Full News

आरोंदा येथे माघी गणेश जयंती निमित्त २२ व २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१८-: आरोंदा येथे श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिरात गणेश जयंती निमित्त २२ व २३ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले असून,गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता गणेश मूर्तीचे आगमन ,सकाळी ९:०० ते १० :०० वाजता श्रींची पूजा ,अभिषेक ,दुपारी १२ :०० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १:०० ते ३:०० वा.महाप्रसाद, सायंकाळी ३:०० ते…

Read Full News

You cannot copy content of this page