⚡सावंतवाडी ता.१४-: श्री कलेश्वर विद्या मंदिर, वेत्ये शाळेत काल शुक्रवार, (१३ मार्च रोजी) शैक्षणिक उपक्रमांतर्गत शाळा पातळीवर गावठी वस्तूंचा बाजार भरविण्यात आला. या उपक्रमात विविध प्रकारच्या घरगुती वस्तू, ताज्या भाजीपाल्याच्या विक्रीसह खाद्यपदार्थ व थंड पेयांचे स्टॉल लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या बाजाराचे उदघाटन वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र गावकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, मुख्याध्यापक शीतल गावित, महेश गावडे, परशुराम पाटकर, भरत जाधव, अरविंद सरनोबत, रेश्मा गावडे, दिक्षा आडारकर, महिला पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचा उत्साह द्विगुणित केला.
श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेत शैक्षणिक उपक्रमांतर्गत गावठी बाजार…
