संजू परब: तर एका सत्ताधारी व्यक्तीनं कंपनीकडून ३० लाख रुपये घेतल्याचा केलाय गंभीर आरोप..
सावंतवाडी : शहरामध्ये एमएनजीएल गॅस कंपनीचे काम अनेक दिवस सुरू आहे. या कंपनीने न. प. च्या अटीशर्तींचे पालन न करता गॅस पुरवठा करण्याचा घाट घातला आहे. उद्या गॅस गळती झाली अन् दुर्घटना घडली तर जबाबदार कोण ? असा सवाल प्रशासनाला केला. यावेळी हे काम चुकीच आहे, गॅस पुरवठा करण्याची परवानगी घेतलेली नाही अस सांगितल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा विरोधी नगरसेवक संजू परब यांनी दिली. तर एका सत्ताधारी व्यक्तीनं कंपनीकडून ३० लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. परब म्हणाले, परवानगी न घेता गॅस पुरवठा करण्याची तयारी कंपनीने केली आहे. त्यामुळे अधिकारी काय करतात ? हा सवाल आहे. लोकांच्या जीवितास धोका निर्माण होणार हे काम थांबवाव अशी मागणी आम्ही केली. यावेळी दुर्घटना झाली तर कंपनीन जबाबदार राहणार असल्याचे ऍफिडेव्हीट लिहून दिलं आहे. मात्र, असं लिहून दिलं म्हणजे सुरक्षितता होतं नाही. लोकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. पुरवठा करण्याबाबत या कंपनीने कोणतीही कल्पना नगरपरिषदेला दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी ही सुविधा घेऊ नये. यात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यांचे दर देखील ठरलेले नाहीत. कंपनी किती रुपयांनी गॅस देणार हे ठरलेलं नाही. ६ हजार रूपयांप्रमाणे शहरात ७ हजार कनेक्शन दिली जाणार आहे. ६ हजार ही किंमत खर्चिक व अवाजवी आहे. त्यात एका सत्ताधारी व्यक्तीनं यातील १ हजार प्रमाणे ७० लाखांची मागणी केली आहे. त्यापैकी ३० लाख रुपये आगाऊ घेत ५ वर्ष आम्हीच आहोत असं सांगून पैसे घेतलेत. त्या सत्ताधारी व्यक्तीच नाव घ्यायला ही घाबरत नाही. नळपाणी, गॅससह अशीच आणखीन दोन प्रकरण देखील आहेत. ही सगळी माहिती घेऊन संबंधितांच नाव देखील जाहीर करेन असा इशारा श्री. परब यांनी दिला. तसेच प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी केवळ खुर्चीवर न बसता याकडे लक्ष द्यावं, या प्रकाराची माहिती घ्यावी. अन्यथा, दुर्घटना घडल्यास नगराध्यक्ष अन् प्रशासन जबाबदार राहील अस विधान त्यांनी केल. तसेच संजू परब असेपर्यंत न.प. मध्ये बेकायदेशीर काम होऊ देणार नाही असा इशाराही दिला. यावेळी क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते.
