Headlines

राष्ट्रवादी काँग्रेसचे.अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतली भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचे पवार यांनी केले कौतुक 💫कुडाळ दि.१९-: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मुंबई येथे भेट घेऊन जिल्ह्यातील पक्ष संघटना वर्षपुर्ती अहवाल सादर केला. यावेळी पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचे कौतुक करीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी…

Read Full News

जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी यांचे निधन….

💫कुडाळ दि.१९-: जनता दल पक्षाचे समाजवादी नेते उदय नाडकर्णी (७५) यांचे आज सकाळी ८ वाजता राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.लहान पणापासूनच समाजवादी विचारसरणीने जीवन जगणारे उदय नाडकर्णी यांनी माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते, समाजवादी नेते बबन डिसोझा, किशोर पवार, जयानंद मठकर, माजी आमदार बाली किनळेकर, पुष्पसेन सावंत या समाजवादी नेत्यांबरोबर काम केले. माजी आमदार बाली…

Read Full News

रस्ते दुरावस्थे बाबत भाजप आंदोलन छडणार….

तालुकाध्यक्ष नासीर काझी यांचे तहसिलदारांना निवेदन 💫वैभववाडी दि.१९-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित विभाग या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा वैभववाडी भाजपच्या वतीने देण्यात…

Read Full News

दुर्गमावळा प्रतिष्ठान पोवाडा स्पर्धेत अमृत, आर्या, पार्थचे यश….

💫मालवण दि१९-: दुर्गमावळा प्रतिष्ठान, कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेत माळगाव बागायत येथील अमृत धामापूरकर, आर्या भोगले, पार्थ खोत यांनी यश संपादन केले. कोरोना लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या अमृत धामापूरकर कलागुणांना वाव देण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानने राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धा विविध गटांतून आयोजित केली होती. या स्पर्धेत माळगाव-बागायत येथील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग…

Read Full News

विना मास्क फिरणाऱ्यांवर मालवण पालिकेची धडक कारवाई….

१० दिवसात १० हजारांचा दंड वसूल;पर्यटकांकडून सर्वाधिक दंड वसली 💫मालवण दि.१९-: कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मालवण पालिकेकडून शहरात कोरोना खबरदारी नियमांची काटेकोर पालन सुरू आहे. गेले काही महिने विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत १० दिवसात १० हजारांचा दंड वसूल झाला आहे. सर्वाधिक दंड वसुली विनामास्क…

Read Full News

जिल्हा काँग्रेसतर्फे आनंद अनाथ आश्रममधील जेष्ठ नागरिकांना खाद्यपदार्थ व मास्कचे वाटप

💫मालवण दि.१९-: भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हा काँग्रेसचे सचिव महेश ऊर्फ बाळू अंधारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत कुडाळ अनाव येथील आनंद अनाथ आश्रम मधील जेष्ठ नागरिकांना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने खाद्यपदार्थ तसेच फिनेल व मास्कचे वाटप करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद…

Read Full News

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेले घंटानाद आंदोलन नवव्या दिवशीही सुरू.

💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-: वेंगुर्ला पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्हानु जगन्नाथ सरमळकर यांना पदोन्नती मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. यासाठी १० नोव्हेंबरपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत सुरू केलेले घंटानाद आंदोलन आज नवव्या दिवशीही सुरू आहे. कोरोना नियमावलीचे पालन करुन भीमगीतांसह घंटानाद सुरू आहे.

Read Full News

सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळात संजू विरनोडकर टीमतर्फे निर्जंतुकीकरण….

▪️आतापर्यंत दोनशेच्या आसपास रेड झोनमध्ये कोरोना निर्जंतुकीकरण करणारी टीम 💫सावंतवाडी दि.१९-:बुधवारी दिवसभरात माध्यमिक विद्यालय डेगवे व सेंट्रल इंग्लिश स्कुल सावंतवाडी शहर आणि सर्व शिक्षा अभियान शिक्षण विभाग कार्यालयात संजू विरनोडकर टीमतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या टीमने आतापर्यंत दोनशेच्या आसपास रेड झोनमध्ये कोरोना प्रतिबंधक फवारणी करुन निर्जतुकीकरण केले आहे. उन्हाळ्यात, पावसाळ्यात व आतापर्यत जिवाची पर्वा नकरता…

Read Full News

कोरोना काळात वीज वितरणने अव्वाच्या सव्वा बिले लादल्याने जनतेच्या खिशाला कात्री…..

मंगेश तळवणेकर यांचा सवाल 💫सावंतवाडी दि.१९-: कोरोना काळात सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त असताना वीज वितरण महामंडळाने सर्वसामान्य जनतेवर अव्वाच्या सव्वा वाढीव बिले लादुन खिशाला कात्री लावली आहे. कोरानाचा सुरवातीला काळ संपला आणि लोकांच्या हातात वीजबिले पडली, ती पाहून सर्वसामान्य जनता अधिकच त्रस्त झाली आहे. अशीही वाढीव बिले का व कोणत्या निकषांच्या आधारे आकारली, असा सवाल…

Read Full News

🌷 अभिनंदन🌷 अभिनंदन🌷 अभिनंदन🌷 💐💐💐💐आमच्या टिमच्या सदस्या सौ.मोहिनीताई मडगावकर. 💐💐💐💐भारतीय जनता पार्टी शहर मंडल महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी राजकीय वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा 🌷💐💐💐💐💐🙏शुभेच्छूक 🙏 🔹 संजु विरनोडकर.🔹 संतोष तळवणेकर व टिम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Read Full News

You cannot copy content of this page