कोरोना काळात वीज वितरणने अव्वाच्या सव्वा बिले लादल्याने जनतेच्या खिशाला कात्री…..

मंगेश तळवणेकर यांचा सवाल

💫सावंतवाडी दि.१९-: कोरोना काळात सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त असताना वीज वितरण महामंडळाने सर्वसामान्य जनतेवर अव्वाच्या सव्वा वाढीव बिले लादुन खिशाला कात्री लावली आहे. कोरानाचा सुरवातीला काळ संपला आणि लोकांच्या हातात वीजबिले पडली, ती पाहून सर्वसामान्य जनता अधिकच त्रस्त झाली आहे. अशीही वाढीव बिले का व कोणत्या निकषांच्या आधारे आकारली, असा सवाल श्री देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केला प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. २५ नोव्हेंबरपूर्वी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा वीज महामंडळासमोर भव्य मोर्चा काढुन शासनाचे लक्ष
वेधण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या प्रसिद्धी पत्रकात तळवणेकर म्हणाले, वीज वितरण महामंडळाने भरमसाठ वीज बिले आकारली आहेत. साधारण विजबीले आली असती तर, ती लगेच भरली गेली असती. मात्र अव्वाच्या सव्वा बिले आकारल्याने जनतेची डोकेदुखी अजुनच वाढली.

ही वाढीव बिले कोणत्या निकषांच्या आधारे आकारली याची चौकशी करण्याऐवजी उर्जामंत्र्यांनी विज बिले भरलीच पाहिजेत, असा फतवा काढला. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, कामगार वर्ग कोरोनातुन सावरताना पुन्हा एकदा डोकेदुखीत भर टाकली गेली आहे. या सर्व परिस्थितीवर समाधानकारक तोडगा काढावा अशी, अशी विनंतीही तळवणेकर यांनी केली आहे. याबाबत २५ नोव्हेंबरपूर्वी ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्यावतीने २५ नोव्हेंबर रोजी महामंडळासमोर काही हजारांच्या घरातील बिले दाखवत सकाळी ११.०० वाजता भव्य मोर्चा काढुन शासनाचे लक्ष वेधण्यात येईल, असा इशाराही तळवणेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page