▪️आतापर्यंत दोनशेच्या आसपास रेड झोनमध्ये कोरोना निर्जंतुकीकरण करणारी टीम
💫सावंतवाडी दि.१९-:
बुधवारी दिवसभरात माध्यमिक विद्यालय डेगवे व सेंट्रल इंग्लिश स्कुल सावंतवाडी शहर आणि सर्व शिक्षा अभियान शिक्षण विभाग कार्यालयात संजू विरनोडकर टीमतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात आले. या टीमने आतापर्यंत दोनशेच्या आसपास रेड झोनमध्ये कोरोना प्रतिबंधक फवारणी करुन निर्जतुकीकरण केले आहे.
उन्हाळ्यात, पावसाळ्यात व आतापर्यत जिवाची पर्वा नकरता गावागावात, शहरात घरोघरी जाऊन, बाजारपेठा मंदिर, वाड्या, पोलिस स्टेशन, शासकीय कार्यालय, आरोग्य केंद्र, बॅका, जिल्हा न्यायालय व जिल्ह्यात जीथे जीथे कंटेन्मेंट झोन असेल तीथल्या बाधितांच्या संपुर्ण घरात असे दोनशेच्या आसपास रेड झोन मध्ये कोरोना प्रतिबंधक फवारणी करुन निर्जतुकीकरण करणारी संजु विर्नोडकर टिम सचोटीने लढत आहे.
२३ नोव्हेंबरपासुन सुरु होणार्या शाळा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याच्या व शिक्षणाच्या सेवेसाठी हायस्कुल व शाळांमध्थे संजू विरनोडकर टीमतर्फे निर्जतुकीकरण कार्य करण्यात येत आहे. काल दिवसभरात माध्यमिक विद्यालय डेगवे व सेंट्रल इंग्लिश स्कुल सावंतवाडी शहर आणि सर्व शिक्षा अभियान शिक्षण विभाग कार्यालयात निर्जंतुकीकरण करुन ऊपक्रम राबविला. डेगवे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याधापिका माधवी सावंत, सेंट्रल स्कुलच्या मुख्यधापिका निर्मला हेशागोळ. चेअरमन श्री.ईम्तियाज अब्दूल सत्तार यांनी संजू विरनोडकर टिमचे आभार मानले.