💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-: वेंगुर्ला पंचायत समितीचे कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले न्हानु जगन्नाथ सरमळकर यांना पदोन्नती मिळण्यापासून वंचित ठेवले आहे. यासाठी १० नोव्हेंबरपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत सुरू केलेले घंटानाद आंदोलन आज नवव्या दिवशीही सुरू आहे. कोरोना नियमावलीचे पालन करुन भीमगीतांसह घंटानाद सुरू आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेले घंटानाद आंदोलन नवव्या दिवशीही सुरू.
