💫मालवण दि.१९-: भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हा काँग्रेसचे सचिव महेश ऊर्फ बाळू अंधारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत कुडाळ अनाव येथील आनंद अनाथ आश्रम मधील जेष्ठ नागरिकांना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने खाद्यपदार्थ तसेच फिनेल व मास्कचे वाटप करण्यात आले
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, देवानंद लुडबे, कार्याध्यक्ष सिद्धेशभाई परब, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, कुडाळ विधानसभा युवक अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, उपाध्यक्षा पल्लवी तारी, कुडाळ युवक अध्यक्ष महेश म्हाडदळकर, शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, वैभव आजगावकर, रोहन काणेकर, सावंतवाडी शहराध्यक्ष साद शेख, मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, आदींसह जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी इंदिराजींच्या जीवन व कार्यशैली यावर पल्लवी तारी यांद्वारे कथन करण्यात आले