💫मालवण दि१९-: दुर्गमावळा प्रतिष्ठान, कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धेत माळगाव बागायत येथील अमृत धामापूरकर, आर्या भोगले, पार्थ खोत यांनी यश संपादन केले.
कोरोना लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या अमृत धामापूरकर कलागुणांना वाव देण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानने राज्यस्तरीय ऑनलाईन पोवाडा गायन स्पर्धा विविध गटांतून आयोजित केली होती.
या स्पर्धेत माळगाव-बागायत येथील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात अमृत धामापूरकरने खुल्या गटात तृतीय, गट क्रमांक २ मधून आर्या अनिल भोगलेने सातवा तसेच खुल्या गटात पार्थ संजय खोतने चौथा क्रमांक पटकावून यश संपादन केले. ऑनलाईन पोवाडा गायनासाठी संगीत साथ साईश संजय खोत, संकेत संतोष भोगले यांनी दिली असून कोरस साथ स्वरा भोगले, यशश्री ताम्हणकर, आर्या भोगले यांनी केली. मार्गदर्शन शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, शिक्षिका तेजल ताम्हणकर, साईश खोत यांनी केले. यश संपादन केलेल्या अमृत, आर्या, पार्थ यांचे ब्राह्मणदेव ग्रामविकास मंडळ, बागायत व माळगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.