Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्याची पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान कार्यशाळा संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.१३-: पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 ची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यशाळा वसंत स्मृती ओरोस येथे संपन्न झाली. या कार्यशाळेला अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले. या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई यांनी या महाप्रशिक्षण अभियानाचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती समजावून सांगताना ” व्यक्ती निर्माणातुन संघटन निर्माण, संघटन निर्माणातुन राष्ट्र निर्माण ” हे प्रशिक्षणाचे…

Read Full News

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत ‘फार्मा अन्वेषण २०२६’चे आयोजन…

पीसीआयतर्फे शिक्षण, संशोधन व उद्योगक्षेत्र एकत्र आणणारा उपक्रम…. ⚡सावंतवाडी ता.१३-: फार्मसी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांना एकाच व्यासपीठावर आणणारा ‘फार्मा अन्वेषण २०२६’ हा कार्यक्रम यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read Full News

साटेली-भेडशी येथे काजू खरेदीचा शुभारंभ….

दोडामार्ग, दि. १३ : तळकोकण फार्मा प्रोड्युसर कंपनीतर्फे साटेली-भेडशी येथील विजयदुर्गा ॲग्रो सर्विस येथे काजू खरेदी उपक्रमाचा शुभारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक विजय कुमार रेड्डी प्रमुख उपस्थित होते.कंपनीचे अध्यक्ष भिकाजी गणपत्ये यांनी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. बँक ऑफ इंडिया कडून आवश्यक सहकार्य दिले जाईल,…

Read Full News

एसटी कामगार सेनेचे उद्या कुडाळला महाराष्ट्रव्यापी अधिवेशन…

सरचिटणीस हिरेन रेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती:माजी मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उदघाटन . ⚡कुडाळ ता.१३-: महाराष्ट एसटी कामगार सेनेचे महाराष्ट्रव्यापी अधिवेशन शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी कुडाळ येथे होणार आहेत. यावेळी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी…

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला विविध सामाजिक उपक्रम…

कणकवली : कणकवली तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या बैठकीत कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सकाळी ७.३० वाजता एस.टी. वर्कशॉपजवळील श्री गणेश मंदिर येथे अभिषेक करण्यात येणार असून त्याचे आयोजन सुनील पारकर…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात जमीन विकणे आहे

💫 जमीन विकणे आहे..⚡ सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलमहाराष्ट्र–गोवा सीमेवर, सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथे सुमारे ४ एकर जागा विक्रीसाठी उपलब्ध आहे. 👉मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर 👉चारचाकी वाहनांसाठी रस्ता उपलब्ध 👉क्लिअर टायटल – कुटुंबीय मालमत्ता 👉सर्व कागदपत्रे व्यवस्थित व स्पष्टरिसॉर्ट, फार्महाऊस किंवा गुंतवणुकीसाठी योग्य जागा 👉परिसरात वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध 👉तसेच, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अंदाजे…

Read Full News

वेंगुर्ला पोलिस पथकाची जलद तपास व धडक कामगिरी..

90 लक्ष फसवणूक प्रकरणी दोघा संशयिताना ताब्यात.. ⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला शहरातील एका तरुण व्यावसायिक युवकाची 9 लाख 90 हजार रुपयाची आर्थिक फसवणूकीची घटना घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता ते 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वा.या मुदतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये घडली होती. याबाबत संबंधित युवा व्यावसायिकाने वेंगुर्ला पोलिसात धाव घेऊन दहा…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचेही मोठे योगदान…

श्री. मनीष दळवी ; ओरोस येथील क्रिकेट स्पर्धेतमुख्यालय पत्रकार संघ विजेता – वेंगुर्ला संघ उपविजेता.. ⚡ओरोस ता.१२-: आज सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या एका योग्य उंचीवर जात आहे. पत्रकारांचेही जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. आजकाल निरोगी आयुष्यासाठी मैदानी खेळाची गरज भासत आहे. त्यादृष्टीने मुख्यालय पत्रकार जिल्ह्यातील पत्रकारांसाठी करीत असलेले क्रिकेट स्पर्धेचे आयोजन स्तुत्य उपक्रम आहे. यापुढेही आपण…

Read Full News

धामापूर – मालवण नव्या नळपाणी योजनेचे काम बोगसपणे सुरु…

ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप.. ⚡मालवण ता.१२-:मालवण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धामापूर – मालवण नव्या नळपाणी योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरु असून चौके येथे सुरु आलेल्या या नळपाणी योजनेच्या कामाची ठाकरे शिवसेना गटनेते महेंद्र म्हाडगूत, पाणीपुरवठा समिती सदस्य तपस्वी मयेकर यांनी पाहणी करत हे काम बोगस पद्धतीने सुरु असल्याचा आरोप करत या कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याबाबत…

Read Full News

“बांद्यात १५ मार्च रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.१२-: रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा तसेच मराठा समाज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात येणार आहे. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने…

Read Full News

You cannot copy content of this page