आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन..
⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील पाट येथील तलाव सुशोभीकरण या महत्त्वपूर्ण विकासकामाचे भूमिपूजन कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच स्थानिक नागरिकांना आणि भाविकांना एक आकर्षक व स्वच्छ परिसर उपलब्ध होणार आहे.
तलाव परिसर हा गावाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू असतो. या सुशोभीकरण प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धन, पर्यटन वाढ तसेच ग्रामस्थांसाठी विरंगुळ्याचे सुंदर ठिकाण निर्माण होण्यास मदत होणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेशजी राणे साहेब सातत्याने प्रयत्नशील असून विविध विकासकामांद्वारे कुडाळ तालुक्याच्या प्रगतीला नवी दिशा देत आहेत.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश कानडे, श्री. दीपक नारकर, सौ. आरती पाटील, तालुका प्रमुख श्री. विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख श्री. अरविंद करलकर, समाधान परब तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त करत गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनीही या कामाबद्दल आनंद व्यक्त करत आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.
