वालावल श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील तलावाचे होणार सुशोभीकरण…

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन..

कुडाळ : तालुक्यातील निसर्गरम्य वालावल गावामधील श्री लक्ष्मी नारायण मंदिर परिसरात होणाऱ्या तलाव सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिीत संपन्न झाले. गावाच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच पर्यटन आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारा हा विकास प्रकल्प भविष्यात वालावलच्या ओळखीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
या सुशोभीकरणामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ आणि पर्यटकांसाठी सुविधायुक्त होणार असून स्थानिक ग्रामस्थांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे. पारंपरिक वारसा आणि आधुनिक विकास यांचा सुंदर संगम साधण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, माजी जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, तालुका प्रमुख श्री. विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख श्री. अरविंद करलकर, द्यानंद चौधरी, सरपंच राजा प्रभू तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वालावल गावाच्या विकासासाठी आणि धार्मिक स्थळांच्या संवर्धनासाठी अशा प्रकारची कामे भविष्यातही सातत्याने सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. गावाच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांचे एकत्रित प्रयत्न निश्चितच विकासाला नवी गती देतील.

You cannot copy content of this page