Headlines

राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे झंजावाती नियोजन दौऱ्याचे प्रमुख प्रमोद जठार यांच्या आढावा बैठकांची जोरदार सुरुवात

*⚡कणकवली दि.११-:* कोकणचे नेतृत्व ना. नारायणराव राणे यांची जन आशीर्वाद यात्रा १९ ते २६ ऑगस्ट या काळात मुंबईपासून ते सिंधुदुर्गपर्यंत निघत आहे. या झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाला मिळालेले केंद्रीय मंत्रीपद, रोजगाराच्या क्षेत्रात कोकणच्या बेरोजगारांना उभे करू शकण्याची क्षमता असणारे मध्यम, लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रालय आणि कोकणातील सध्याची राजकीय स्थिती पाहता ही यात्रा प्रचंड जोशात…

Read More

केदार जामसंडेकर स्मृतीदिनानिमित्त १७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

*⚡मालवण दि.११-:* स्व.केदार जामसंडेकर स्मृतीदिना निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तदान, देहदान, अवयवदान आणि रुग्णमित्र या क्षेत्रातील अग्रेसर संस्था , सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार दि. १७ आॕगष्ट २०२१ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात जाणवणारा प्रचंड रक्त तुटवडा लक्षात घेता तरुण…

Read More

खिडकीतला निसर्ग फोटो राज्यस्तरीय स्पर्धेत वैभववाडीतील मंथन संतोष टक्के प्रथम

*⚡वैभववाडी ता.११-:* खिडकीतला निसर्ग फोटो’ या राज्यस्तरीय स्पर्धेत वैभववाडीतील कु. मंथन संतोष टक्के याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ‘वयम्’ मासिकातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मंथनच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या स्पर्धेत राज्यातील 150 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत स्पर्धकांना घरातून,…

Read More

शेर्लेत 13 व 14 रोजी महिला बचत गटांसाठी केक प्रशिक्षण

*⚡बांदा दि.११-:* युवा परिवर्तन संस्था सिंधुदुर्गच्यावतीने दि. १३ व १४ ऑगस्ट रोजी शेर्ले येथील महिला बचत गटांसाठी दोन दिवसाचे केक बनविण्याचे प्रशिक्षण शेर्ले ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे रिपोर्टिंग मॅनेजर विवेक नाईक, प्रशिक्षक शुभांगी कावले, प्रकल्प समन्वयक शशिकांत सातार्डेकर व किशोरी बांदेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षणाचा…

Read More

सावंतवाडी-सातार्डा व बांदा-शिरोडा एसटी सुरू करा

नंदा गावडे यांची मागणी : ग्रामीण भागातील नागरिकांची वाहतुकीची समस्या *⚡बांदा दि.११-:* गणपती उत्सवात लागणाऱ्या घरगुती साहित्य खरेदीसाठी मडुरा पंचक्रोशीसह आरोस मधील नागरिकांना खरेदीसाठी बांदा व सावंतवाडी बाजारपेठेत यावे लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली बांदा-शिरोडा व सावंतवाडी-पाडलोसमार्गे सातार्डा एसटी प्रवाशांची अडचण लक्षात घेता सुरू करावी अशी मागणी, पाडलोस ग्रामपंचायत माजी सदस्य नंदा गावडे यांनी केली…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २३ रूग्ण सापडले…

*⚡सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी तालुक्यात आज २३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी ३, सालईवाडा ६, माठेवाडा १, न्यू खास्कीलेडा १, खासकिलवाडा १, भटवाडी १ तर ग्रामीण भागात माजगाव २, सांगेली १, चराठा १,…

Read More

म्हापण येथील वळणावर आकाश फिशमील अ‍ॅन्ड फिशऑईल कंपनीने बहीर्वक्र आरसा बसविला

ग्रामस्थांच्या मागणीला आले यश *⚡वेंगुर्ले ता.११-:* म्हापण वेंगुर्ला रस्त्यावरील म्हापण ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळील तीव्र उतार व वळण हे वाहनचालकांना धोकादायक ठरत असुन आजपर्यंत अनेक अपघात या जागी झालेले आहेत. वळण यु आकाराचे असल्याने येणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघाताचा धोका आणखीनच वाढत होता. ही गंभीर बाब लक्षात घेवुन या वळणावर बहीर्वक्र आरसा बसवावा अशी मागणी…

Read More

आचरा, मालवण शहर, चौके व कट्टा येथे ना. नारायण राणे यांचे भव्य स्वागत करणार

भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली माहिती *⚡मालवण दि.११-:* केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर प्रथमच कोकण दौऱ्यावर येत असलेल्या ना. नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑगस्ट रोजी आगमन होणार असून ना.राणे यांचे २६ ऑगस्ट रोजी मालवणात जंगी स्वागत करण्यात येणार आहे. २६ ऑगस्टला मालवण तालुक्यात आचरा, मालवण शहर, चौके व कट्टा अशा चार ठिकाणी…

Read More

आम.वैभव नाईक यांना जि प.अध्यक्ष यांच्या देवबाग दौऱ्याची वाट का बघावी लागली

तौक्ते चक्रीवादळातील अनुदानप्रश्नी सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांचा सवाल *⚡मालवण दि.११-:* तौक्ते चक्रीवादळतील ज्या नुकसान ग्रस्तांचे पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नाही अशा लोकांना येत्या दोन दिवसात अनुदान देण्यात येईल असे आदेश प्रशासनाला दिल्याचे वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मुळात तौक्ते वादळ होऊन प्रदीर्घ कालावधी उलटूनही वैभव नाईक यांना हे जाहीर…

Read More

डंपर आणि आयशर कंटनेरचा झालेला अपघाताला वाहतूक पोलीस जबाबदार

अन्यथा लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार:रुपेश राऊळ *⚡सावंतवाडी दि.११-:* झाराप – पत्रादेवी या महामार्गावरील नेमळे कुंभारवाडी या ठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलिस उभे राहून वाहने थांबवतात त्यामुळे अपघात होतात आज डंपर आणि आयशर कंटनेरचा झालेला अपघाताला वाहतूक पोलीस जबाबदार आहेत,हा प्रकार थांबला नाही तर लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख…

Read More
You cannot copy content of this page