म्हापण येथील वळणावर आकाश फिशमील अ‍ॅन्ड फिशऑईल कंपनीने बहीर्वक्र आरसा बसविला

ग्रामस्थांच्या मागणीला आले यश

*⚡वेंगुर्ले ता.११-:* म्हापण वेंगुर्ला रस्त्यावरील म्हापण ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळील तीव्र उतार व वळण हे वाहनचालकांना धोकादायक ठरत असुन आजपर्यंत अनेक अपघात या जागी झालेले आहेत. वळण यु आकाराचे असल्याने येणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघाताचा धोका आणखीनच वाढत होता. ही गंभीर बाब लक्षात घेवुन या वळणावर बहीर्वक्र आरसा बसवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत होती. आकाश फिशमील अ‍ॅन्ड फिशऑईल कंपनीने ही गरज लक्षात घेवुन सामाजिक भावनेने येथे स्वखर्चाने नवीन बहीर्वक्र आरसा बसविला आहे. त्यामुळे प्रवाशी वाहनचालकांना समोरुन येणार्‍या वाहनांचा वेळीच अंदाज येवुन अपघाताचा धोका टळणार आहे. आकाश फिशमील कंपनीच्या या कार्याचे म्हापण गावच्या वतीने कौतूक व आभार व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आकाश फीश मिल कंपनीचे कर्मचारी मनोहर खोत, सुजित केळुसकर, बाळा कुभांर, उत्तम साटम उपस्थित होते.

You cannot copy content of this page