*⚡सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी तालुक्यात आज २३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १३ तर ग्रामीण भागात १० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सावंतवाडी ३, सालईवाडा ६, माठेवाडा १, न्यू खास्कीलेडा १, खासकिलवाडा १, भटवाडी १ तर ग्रामीण भागात माजगाव २, सांगेली १, चराठा १, वेत्ये १, इन्सुली १, आंबेगाव ३, कारीवडे १ असे रुग्ण सापडले असून सद्य स्थितीत तालुक्यात १८९ रुग्ण सक्रिय आहेत.
