*⚡बांदा दि.११-:* युवा परिवर्तन संस्था सिंधुदुर्गच्यावतीने दि. १३ व १४ ऑगस्ट रोजी शेर्ले येथील महिला बचत गटांसाठी दोन दिवसाचे केक बनविण्याचे प्रशिक्षण शेर्ले ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे रिपोर्टिंग मॅनेजर विवेक नाईक, प्रशिक्षक शुभांगी कावले, प्रकल्प समन्वयक शशिकांत सातार्डेकर व किशोरी बांदेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन शशिकांत सातार्डेकर यांनी केले आहे.
शेर्लेत 13 व 14 रोजी महिला बचत गटांसाठी केक प्रशिक्षण
