*⚡मालवण दि.११-:* स्व.केदार जामसंडेकर स्मृतीदिना निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तदान, देहदान, अवयवदान आणि रुग्णमित्र या क्षेत्रातील अग्रेसर संस्था , सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार दि. १७ आॕगष्ट २०२१ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात जाणवणारा प्रचंड रक्त तुटवडा लक्षात घेता तरुण युवक युवतीनी रक्तदानाच्या पवित्र जीवनदायी कार्यासाठी सक्रीयपणे पुढे येवुन रक्तदान करावे असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या मालवण तालुका शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. शासनाने घालुन दिलेल्या कोरोनाच्या नियमावली नुसार सदर रक्तदान शिबिर होणार असुन एकाचवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी कृपया आपली नांवे सौ.शिल्पा खोत मोबा नंबर ९४२२५८४६४१, श्री.किशोर नाचणोलकर मोबा नंबर ७७२१८५१३०४ , श्री.निलेश गवंडी मोबा नंबर ९४२१४५६८५७ या मोबाईल नंबरवर आगाऊ द्यावीत असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
केदार जामसंडेकर स्मृतीदिनानिमित्त १७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
