आम.वैभव नाईक यांना जि प.अध्यक्ष यांच्या देवबाग दौऱ्याची वाट का बघावी लागली

तौक्ते चक्रीवादळातील अनुदानप्रश्नी सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांचा सवाल

*⚡मालवण दि.११-:* तौक्ते चक्रीवादळतील ज्या नुकसान ग्रस्तांचे पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नाही अशा लोकांना येत्या दोन दिवसात अनुदान देण्यात येईल असे आदेश प्रशासनाला दिल्याचे वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मुळात तौक्ते वादळ होऊन प्रदीर्घ कालावधी उलटूनही वैभव नाईक यांना हे जाहीर करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या मालवण तालुक्यातील देवबाग दौऱ्याची वाट बघावी लागल्याची खरमरीत टीका मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांनी पत्रकातून केली आहे मालवणचे सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की मुळातच तौक्ते वादळ नुकसान भरपाई साठी पंचनामे करताना काही ठराविक लोकांपुरतेच केल्याची तक्रार देवबाग ग्रामस्थानी अध्यक्ष संजना सावंत यांच्याकडे केल्यावर अध्यक्ष यानी या तक्रारीच्या अनुषंगाने गेल्या आठवड्यात देवबाग गावाला भेट देऊन सर्व प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन लोकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा सुरुवात केली त्यामुळे ज्यांना खरोखरच नुकसान भरपाई मिळणे आवश्यक होते त्यांना मिळाली नसल्याचे व जिथे घर नसतानादेखील घर असल्याचे दाखवून नुकसान भरपाई लाटल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळेच नियमबाह्यपणे देण्यात आलेली नुकसान भरपाई व ज्यांना खरोखरच गरज आहे असे लोक वंचित राहिल्याने याबाबतचा पर्दाफाश करून अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत या आवाज उठवून गरजूना नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याची गोष्ट निश्चित झाल्यानंतर वैभव नाईक यांनी या विषयात उडी घेतली आणि म्हणूनच कधी न येणारे वैभव नाईक मालवण पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या भेटीसाठी आले. त्यामुळे वैभव नाईक यानी हे दिखाऊगिरीचे काम बंद करावे असे नमूद करून त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते यांच्या माध्यमातूनच या देवबाग वासियांच्या समस्या दूर करण्यात येणार असून अध्यक्ष यांच्या प्रयत्नातूनच अशा वंचित राहिलेल्या २२२ कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात येणार आहे व नुकसान भरपाई वाटपात झालेली अनियमितता देखील जनतेसमोर आणणार असल्याचे स्पष्ट केले.

You cannot copy content of this page