Headlines

कणकवलीत राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतील त्रुटींवर तात्काळ दुरुस्तीची मागणी…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावंतवाडी यांचे वेधले लक्ष.. ⚡कणकवली ता.१७-: कणकवली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग फ्लायओव्हर व सर्विस रोडवरील विविध समस्यांबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नगरपंचायत हद्दीतून सुमारे १८०० मीटर लांबीचा फ्लायओव्हर व दोन्ही…

Read Full News

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

चला कुडाळ घडवूया’ अंतर्गत उपक्रम:मंदार शिरसाट आणि लायन्स क्लब यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.१७-: ‘चला कुडाळ घडवूया’ उपक्रम अंतर्गत नगरसेवक मंदार शिरसाठ व लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे संपन्न झाला. रिटायर्ड जीएसटी डेप्युटी कमिशनर गणेश दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला…

Read Full News

मालवण ग्रामीण रुग्णालयात आयुष शिबीर संपन्न…

⚡मालवण ता.१७-:नॅशनल आयुष मिशन अंतर्गत आयुष कक्ष ग्रामीण रुग्णालय मालवण येथे सोमवारीआयुष शिबिर संपन्न झाले. या शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभून विविध आजारांबाबत रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुष शिबिराचे उदघाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी आयुष विभाग जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथून आयुर्वेद तज्ञ म्हणून डॉ. योगेश गोडकर व होमियोपॅथी तज्ञ…

Read Full News

जिल्ह्यातील वकील सभासदांवर केलेले सरोदेंनी आरोप पूर्णतः निराधार, खोडसाळ…

सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे प्रत्युत्तर ⚡​सावंतवाडी ता.१७-:बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सावंतवाडीत आलेल्या ॲड. असीम सरोदे यांनी सावंतवाडी बार असोसिएशन आणि जिल्ह्यातील वकील सभासदांवर केलेले आरोप पूर्णतः निराधार, खोडसाळ आणि दिशाभूल करणारे असल्याची टीका सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी केली आहे. सरोदे यांचा हा खटाटोप केवळ जिल्ह्यातील…

Read Full News

आरोस श्री गिरोबा मंदिर येथे ‘गुढीपाडवा, रामनवमी महोत्सव’…

19 पासून कीर्तन, अभंग स्पर्धांसह दशावतारी नाटकांची मेजवानी.. ⚡सावंतवाडी ता.१७-:श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ आरोसतर्फे गुढीपाडवा व रामनवमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 19 मार्च ते 27 मार्च पर्यंत हे कार्यक्रम सादर होणार आहेत. 19 मार्च रोजी ते 27 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी 7 वा. तुळस येथील कीर्तनकार ह….

Read Full News

शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेत शालेय बाल क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१७-: तालुक्यातील शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेत शालेय बाल क्रीडा महोत्सव २०२५–२६ मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रंजना तेली, उपाध्यक्ष महेश पंतवालावलकर, सदस्य अमित गावकर, प्रियांका दळवी, अपर्णा राऊळ, सिध्दी कुडव, प्रज्ञा राऊळ, शिक्षणप्रेमी…

Read Full News

कुडाळ शहरात राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य. ⚡कुडाळ ता.१७-: आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरातील कार्यकर्त्यांनी राणे समर्थक प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.या राणे समर्थक प्रतिष्ठानमध्ये शिवसेना कुडाळ शहर प्रमुख अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, ॲड. राजीव कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, चेतन पडते, आनंद अणावकर, प्रथमेश…

Read Full News

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेश्वर येथे अभिषेक…

⚡देवगड ता.१७-:शिवसेना कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे देवगड तालुका शिवसेना कार्यकर्त्यांकडून श्री देव कुणकेश्वर मंदिरात विधीवत अभिषेक करण्यात आला. आमदार निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात यश लाभो, अशी मनोभावे प्रार्थना श्री देव कुणकेश्वर चरणी करण्यात आली. या…

Read Full News

वेंगुर्ला दाभोली येथे महिलामार्फतदारूअड्यावर धाड…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावातील महिलांनी महिला ग्रामसभेत एकत्र येत दारूबंदी ठराव घेतला होता व कारवाई करण्याचे वेंगुर्ला पोलिसांना निवेदन सादर केले होते. त्यानुसार वेंगुर्ला पोलिसांनी शनिवारी धाडसत्र मोहीम राबविली होती. परंतु त्यानंतर आज गावातील महिलांनी दाभोली ख्रिश्चनवाडी येथे दारूअड्यावर एकत्र येत धाड टाकली आहे. यावेळी गोवा बनावटीची दारू आढळून आली आहे, याबाबतची माहिती…

Read Full News

निरवडे येथे ३ आणि ४ एप्रिलला निरवडे महोत्सवाचे आयोजन…

गणेश मेस्त्रींचा आवाज अन नागेश आडगावकरांची शास्त्रीय गायकी; दिग्गज कलाकारांची हजेरी… ⚡सावंतवाडी,ता.१७-: कोकणच्या मातीतील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा ‘निरवडे महोत्सव २०२६’ पहिल्यांदाच मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. निरवडे ग्रामस्थ व श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा दोन दिवसीय सांस्कृतिक महाकुंभ येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी निरवडे, माळकरवाडी येथे…

Read Full News

You cannot copy content of this page