Headlines

बेटी बचाओ बेटी पढाओ’ मालवण तालुक्यात डिजिटल चित्ररथ जनजागृती…

तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते शुभारंभ : महिला व बालविकास विभागाचा उपक्रम.. ⚡मालवण ता.२१-:महाराष्ट्र शासन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या मालवण तालुक्यातील डिजिटल चित्ररथ जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात बालिका/महिलांविषयक योजना प्रचार प्रसिद्धी करणेच्या अनुषंगाने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’…

Read Full News

डिझेल दरवाढ नियंत्रणासाठी मत्स्य विभागाने लक्ष घालावे…

रामेश्वर मच्छिमार सहकारी संस्थेची मागणी.. ⚡मालवण ता.२१-:आखाती भागात सुरु असलेल्या युद्धामुळे औद्योगिक डिझेलचे दर वाढले असून तेल कंपन्यांकडून मच्छिमार सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्याने मच्छिमारी व्यवसाय संकटात आला आहे, त्यामुळे याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाने लक्ष घालून डिझेल दरवाढीची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मालवण दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी…

Read Full News

नांदगाव पावाचीवाडी येथे भरधाव कारची ट्रॅक्टरला धडक; प्रवाशी जखमी…

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव पावाचीवाडी बसस्टॉप नजीक भरधाव कारची ट्रॅक्टरला जोरदार धडक बसून अपघात घडला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी सुमारे २:०० वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कार मुंबईच्या दिशेने जात असताना नांदगाव पावाचीवाडी परिसरात आली. त्याचवेळी महामार्गालगत जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने…

Read Full News

खाजगी बसमधील प्रवाशाचा अडीच लाखांचा कॅमेरा चोरी करणारा संशयित आरोपी दिल्लीतून जेरबंद…

⚡वैभववाडी ता.२१-: दोन महिन्यापूर्वी खाजगी आराम बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा किमती कॅमेरा चोरणाऱ्या सराईत चोरट्याला वैभववाडी पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. कमलकुमार मुकुंदलाल रेहान वय 40 रा. फरीदाबाद राज्य हरियाणा असे संशयित आरोपीचे नाव आहे.फिर्यादी यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तो मडगाव गोवा ते नांदेड असा खाजगी बसणे प्रवास करीत होता. प्रवासादरम्यान…

Read Full News

आंब्याची फांदी अंगावर कोसळून मजुराचा मृत्यू…

पडवे येथील दुर्दैवी घटना:रानबांबुळी वायंगणकरवाडी भागात शोककळा ओरोस ता २१-: यशवंत वामन वायंगणकर (४१, रा. रानबांबुळी वायंगणकरवाडी) यांचा आंब्याच्या झाडाची फांदी अंगावर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवार २० मार्च रोजी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना पडवे शिर्केवाडी येथे घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडलेले यशवंत हे त्या दिवशी मजुरीच्या…

Read Full News

सिताबाई गुरव यांचे निधन…

⚡वैभववाडी ता.२१-: एडगाव गुरववाडी येथील सिताबाई बाळु गुरव यांचे वयाच्या 101 वर्षी निधन झाले. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. माजी मंत्री महादेव जानकर यांचे स्वीय सहाय्यक तानाजी गुरव, मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक शाहु गुरव तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी गुरव, शिवाजी गुरव यांच्या त्या मातोश्री होते.सिताबाई गुरव यांच्यावर…

Read Full News

गगनगडावर २४ ते २६ एप्रिल दरम्यान भव्य संत सोहळा…

⚡वैभववाडी ता.२१-: महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक ऐतिहासिक सुवर्ण योग येत्या २४ ते २६ एप्रिल दरम्यान येथे जुळून येणार असून या निमित्ताने भव्य दिव्य संत सोहळ्याचे श्री क्षेत्र गगनगड गगनबावडा जिल्हा कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ माऊली यांच्या ७५० वा जन्मोत्सव श्री भक्त शिरोमणी संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचा ६७५ वा समाधी सोहळा,तसेच तुकाराम…

Read Full News

*पालकमंत्री नितेश राणे घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा…

हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२१-: व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या…

Read Full News

२३ मार्चला मुंबई – गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन…

कणकवलीत राजू शेट्टींचा इशारा. कणकवली : आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर येत्या २३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता नांदगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुशांत नाईक, संजय नरे,…

Read Full News

राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी शाळेची चमकदार कामगिरी…

⚡बांदा ता.२१-: राज्यस्तरीय गुरुकुल स्पर्धा परीक्षेत घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची अभिमानास्पद कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने जानेवारी २०२६मध्ये घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत इयत्ता पहिलीतील किर्ती राजेंद्र गावकर हिने उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्यात आठवा क्रमांक तसेच राज्यात तेरावा क्रमांक पटकावला…

Read Full News

You cannot copy content of this page